महाराष्ट्र शासन योजना

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

आजचा साक्षीदार दि.३०: विविध योजनेंतर्गत निधी खर्च करतांना त्याद्वारे जिल्ह्यात शाश्वत विकासाची कोणती कामे पूर्ण होणार आहेत, याची माहिती देणे यंत्रणांना बंधनकारक आहे. विकास निधीची मागणी करतांना जिल्हा कोणत्या निर्देशांकात जिल्हा मागे आहे, याचे विश्लेषण करून सुधारित विकास निधी मागणी प्रस्ताव तसेच अतिरिक्त मागणी प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याचे तसेच निधीच्या प्रभावी वापरावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत श्यात पंडा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम, मानव विकास कार्यक्रम, डोंगरी विकास कार्यक्रम आणि जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अतिरिक्त मागणी व कार्यक्रम अंमलबजावणीचा आढावा जिल्हाधिकारी यांनी काल नियोजन भवन येथे घेतला. बैठकीला जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. रमेश, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पूनम पाटे, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, श्रीमती मानसी, कुशल जैन, नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सुर्यवंशी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

मानव विकास योजनेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी ७७ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या असताना त्यांचा गैरवापर प्रवासी वाहतुकीसाठी होत असल्याचे जिल्हाधिकारी यांचे निदर्शनात आणून देताच त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले तसेच जिल्हा परिषदेने यासाठी तपासणी पथक नेमण्याच्या सूचनाही दिल्या. यातील ५५ जुन्या बसेस बदलून नव्या बसेस उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

तालुका स्पेसिफीक योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होऊ शकतो. यातून रोजगार निर्मितीसाठी मानव विकासाशी संलग्न कामे पूर्ण करण्याच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध विकास कामांसाठी निधी खर्च करण्यात येतो मात्र त्यातून अपेक्षित उद्देश साध्य होतोय का, लाभार्थ्यांच्या गरजा ओळखून साहित्य खरेदी केली जाते का, खरेदी केलेले साहित्य संबंधीतांपर्यंत पोहचले का याची तपासणी करण्यासाठी विशेष पथक नेमण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

2025-26 च्या वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त निधी मागणी करणाऱ्या यंत्रणांनी त्या मागणीचे ठोस कारणे स्पष्ट करावी. तसेच जिल्ह्याच्या पुढील पाच वर्षांच्या विकास आराखड्यानुसार आणि पुढील एक वर्षात आवश्यक बाबींची प्राथमिकता निश्चित करून नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बैठकीला कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंधारण, वन, महसूल, पशुसंवर्धन यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

विकास निधी मागणीचे सुधारित प्रस्ताव दोन दिवसांत सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडविणाऱ्या योजना प्रस्तावित करा - सहपालकमंत्री

लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडविणाऱ्या योजना प्रस्तावित करा – सहपालकमंत्री

लोकांच्या जीवनमानात सुधारणा घडविणाऱ्या योजना प्रस्तावित करा - सहपालकमंत्री

एल्डर लाईन ज्येष्ठांचा आधार व जेष्ठांच्या मदतीसाठी "एल्डरलाईन 14567 " ; ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन वर दर वर्षी येतात लाखो कॉल्स

एल्डरलाईन 14567: ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाईन

एल्डर लाईन ज्येष्ठांचा आधार व जेष्ठांच्या मदतीसाठी "एल्डरलाईन 14567 " ; ज्येष्ठ नागरिक हेल्पलाईन वर दर वर्षी येतात लाखो कॉल्स

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

दिव्यांगांसाठी रोजगार: मोबाईल ई-व्हेईकल योजना

दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प महत्वाची भुमिका बजावेल - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प महत्वाची भुमिका बजावेल – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रकल्प महत्वाची भुमिका बजावेल - राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

३० जानेवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अहिल्यानगर येथे आयोजन

३० जानेवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अहिल्यानगर येथे आयोजन

३० जानेवारी रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे अहिल्यानगर येथे आयोजन

अन्न व पोषण सुरक्षा व राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लाभार्थ्यांना बँक खाते आधारकार्डशी संलग्न करुन घेण्याचे आवाहन

लाभार्थ्यांना बँक खाते आधारकार्डशी संलग्न करुन घेण्याचे आवाहन

अहिल्यानगर दि.२४- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण फेब्रुवारी २०२५ पासून डीबीटीद्वारे वितरित करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारकार्डशी संलग्न करुन घ्यावेत आणि आवश्यक कागदपत्रे संबंधित तलाठी यांच्याकडे जमा करण्याचे आवाहन पारनेरच्या तहसिलदार गायत्री सौंदाणे यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर दि.२४- जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि सन २०२३-२४ वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी परिपुर्ण अर्ज २० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अमासिद्ध सोलनकर यांनी केले आहे.