महाराष्ट्र शासन योजना

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर दि.२४- जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि सन २०२३-२४ वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी परिपुर्ण अर्ज २० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अमासिद्ध सोलनकर यांनी केले आहे.

प्रत्येक पुरस्कारासाठी त्या वर्षातील १ जुलै ते पुढील वर्षातील ३० जून या कालावधीसाठी अर्ज सादर करावयाचे आहेत. जिल्ह्यातील एक गुणवंत क्रीडा मार्गदर्शक तसेच गुणवंत खेळाडूंमध्ये प्रत्येकी एक पुरूष, महिला आणि दिव्यांग खेळाडू असे एकुण ४ पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. तसेच सन २०१९-२० या एक वर्षासाठी गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षाच्या खेळाडूंसाठी मागील पाच वर्षाची कामगिरी व क्रीडा मार्गदर्शकासाठी मागील दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल.

गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी खेळाडूने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व पाच वर्षापैकी दोन वर्षे त्या जिल्ह्याच्या मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्र राज्यात क्रीडा मार्गदर्शनाचे कार्य केलेले असले पाहिजे व त्याने पुरस्कार वितरीत करण्यात येणाऱ्या वर्षात वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असणे आवश्यक आहे. गुणवंत क्रीडा कार्यकर्ता पुरस्कारासाठी विशिष्ट एक अधिकृत खेळाच्या प्रचार व प्रसारासाठी पुरस्कार वर्षातील ३० जून रोजी संपणाऱ्या वर्षासह लगतपूर्व १० वर्षापर्यंतचे कार्य केलेले असले पाहिजे.

क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या दहा वर्षात किमान वरिष्ट गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय गटामधील राज्य ते राष्ट्रीयस्तरापर्यंतचे पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील. सांघिक अथवा वैयक्तिक मान्यता प्राप्त क्रीडा प्रकारात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य / जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहित नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तीकरित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील.

पुरस्काराबाबतच्या अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

अहिल्यानगर दि.२४- जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या कार्याचे, योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे, यासाठी शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील पात्र क्रीडा मार्गदर्शक व खेळाडूंनी सन २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२, २०२२-२३ आणि सन २०२३-२४ वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी परिपुर्ण अर्ज २० फेब्रुवारी, २०२५ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अमासिद्ध सोलनकर यांनी केले आहे.

अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे २६ जानेवारी रोजी उद्घाटन | हुतात्मा स्मारक येथून ग्रंथदिंडीचे आयोजन ; दोन दिवस साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे २६ जानेवारी रोजी उद्घाटन

अहिल्यानगर ग्रंथोत्सवाचे २६ जानेवारी रोजी उद्घाटन | हुतात्मा स्मारक येथून ग्रंथदिंडीचे आयोजन ; दोन दिवस साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमाचा जागतिक स्तरावर गौरव; तीन विश्वविक्रमांची नोंद

अहिल्यानगर स्वीप उपक्रम: जागतिक स्तरावर तीन विश्वविक्रम

अहिल्यानगर जिल्ह्याच्या स्वीप उपक्रमाचा जागतिक स्तरावर गौरव; तीन विश्वविक्रमांची नोंद अहिल्यानगर दि.२४- नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीतील लोकाभिमुख व दर्जेदार मतदार जनजागृतीच्या ...

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी होण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ई-केवायसी न केलेल्यांसाठी गावपातळीवर विशेष मोहिम

सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थांकडून प्रस्ताव मागविले | 10 जानेवारी अंतिम मुदत

कुणबी, मराठा-कुणबी , कुणबी – मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेत अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन…

कुणबी, मराठा-कुणबी , कुणबी - मराठा जात प्रमाणपत्रासाठी विशेष मोहिमेत अर्ज करण्याचे जिल्हा प्रशासन तर्फे आवाहन...

वाहतूक पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम…. |रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन…..

ठाणे वाहतूक पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम.... रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन.....

आदिवासींच्या उत्थानासाठी ‘पीएम-जनमन’ महाअभियान

आदिवासींच्या उत्थानासाठी 'पीएम-जनमन' महाअभियान

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ग्रामीण भागातील ओबीसी आणि एसबीसी संवर्गातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलासाठी अर्ज करण्याचे आवाहन