महाराष्ट्र शासन योजना

सांगली, दि. 18 ऑगस्ट 2022 : जल जीवन मिशन अंतर्गत ज्या नळपाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. त्या योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबविण्यात यावी. त्याच बरोबर पाणी पुरवठा योजनांचा पाण्याचा पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांची निश्चिती करताना त्याचा दिर्घ काळापर्यंत उपयोग होईल यासाठी सर्व्हेक्षण करुन प्रस्ताव सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम, जलजीवन मिशन चे प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, जि. प. उप कार्यकारी अभियंता डी. जे. सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सुर्यवंशी, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता उपस्थित होते.

66 नळ पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, नळपाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव तयार करत असताना सदरच्या योजना दिर्घ काळापर्यंत उपयोगात राहतील यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करावे. रेट्रो फिटिंग प्रस्ताव जल जीवन मिशन समितीकडून प्रमाणित करुन घेण्यात यावेत. हे प्रमाणित करताना सर्व निकषांची पुर्तता झाली आहे का याची खात्री करावी. त्याबरोबरच नळपाणी पुरवठा योजनांसाठी पाण्याचा स्त्रोत निश्चित करताना भविष्यकाळामध्ये पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही यासाठी शासनाच्या नोंदणीकृत संस्थांद्वारे स्त्रोतांची तपासणी करण्यात यावी. अभियंत्यांनी पाण्याच्या स्त्रोतांना प्रत्येक्ष भेटी देऊन पाहणी करुन प्रस्ताव तयार करण्यात यावेत.

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची
निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी – जिल्हाधिकारी

जिल्ह्यात 4 लाख 61 हजार 409 कुटुंब संख्या असून जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत आजअखेर 2 लाख 93 हजार 612 कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आली आहे. उर्वरीत 1 लाख 64 हजार 158 कुटुंबांना नळ जोडणी देणे बाकी आहे. जल जीवन मिशन अंतर्गत आज 66 नव्या नळ पाणी पुरवठा योजनांचा प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. तसेच तांत्रिक मान्यता प्राप्त 4 योजनांचा मंजूरी देण्यात आली असून यामध्ये 9 कोटी 41 लाख इतक्या अंदाजपत्रकीय रक्कमेस मंजूरी मिळाली. याद्वारे 1 हजार 560 नळ जोडण्यांचे उद्दिष्ट आहे. तसेच निविदा प्रक्रिया मान्य करण्यात आलेल्या 12 असून त्यासाठी 14 कोटी 93 लाख इतक्या रक्कमेस मान्यता देण्यात आली आहे. याद्वारे 2 हजार नळ जोडण्या करण्यात येणार आहेत. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत शिल्लक कुटुंबाना नळ जोडणी देण्यासाठी 15 योजनांना मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 2 कोटी 91 लाख इतक्या अंदाजपत्रिकीय रक्कमेस मान्यता मिळाली असून यातून सुमारे 10 हजार नळ जोडण्या प्रस्तावित आहे. सौर दुहेरी नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 8 योजनांचा मान्यता देण्यात आली असून त्यासाठी 7 कोटी 35 लाख इतक्या रक्कमेच्या खर्चास मान्यता मिळाली असून यातून सुमारे 1 हजार 400 नळ जोडणी करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यावेळी म्हणाले, नळ पाणी पुरवठा योजनांसाठीचे प्रस्ताव तयार करत असताना स्थानिक प्रशासन व पदाधिकारी यांच्याशी विचार विनिमय करुन प्रस्ताव करावेत. यामध्ये ग्रामपंचायतीचा ठराव घेणे अत्यंत महत्वपुर्ण आहे. त्याबरोबर योजना मंजूरीसाठी जागेच्या उभारणीसाठी आवश्यक जागेचा ताबा मिळणे यासाठी सर्व प्रक्रिया पुर्ण करण्यात येवून प्रस्तावात त्याप्रमाणे नमुद करणे आवश्यक आहे. तसेच नळ पाणी पुरवठा योजनांचे उभारणीसाठीची आवश्यक रक्कम कमी करण्यासाठी पाण्याचा जवळचा स्त्रोत उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावे. या तीनही बाबींची पुर्तता झाल्यानंतर प्रशासकीय बाबतीत मुख्यालयस्तरावरुन सर्वतोपरी मदत करण्यात येईल.

यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कदम यांनी जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या योजनांची सविस्तर माहिती सादर केली. तसेच निविदा प्रक्रिया सुरु असलेल्या योजना, प्रस्तावित असलेल्या योजना तसेच शासनाकडून प्राप्त झालेल्या विविध सूचनांचे यावेळी सादरीकरण केले.

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी – जिल्हाधिकारी

प्रशासकीय मंजूरी मिळालेल्या नळपाणी पुरवठा योजनांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी - जिल्हाधिकारी

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे
जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन. ..

वयोश्री योजनेत ज्येष्ठांना साहित्य वाटपात अहमदनगर जिल्हा देशात प्रथम – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राष्ट्रीय वयोश्री योजनेत ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे जिल्ह्यात यशस्वीपणे वाटप

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे…

अनुसुचित जमातीच्या उमेदवारानी अत्याधुनिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करावे...

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना …

“सद्भावना दिवस” व “सामाजिक ऐक्य पंधरवडा” साजरा करण्याच्या जिल्हा प्रशासनाकडून सूचना ...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार - कृषी मंत्री अब्दुल सत्तार

जनकल्याणाच्या योजना – नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना…

जनकल्याणाच्या योजना - नोंदणी  केलेल्या बांधकाम कामगारांसाठी आरोग्य योजना...

राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली…

राष्ट्रीय लोकअदालतीने ५ जोडप्यांची दुभंगलेली मने जुळविली.. १ हजार ५८० प्रकरणे निकाली, विशेष कलमांच्या ७२० प्रकरणाचा निपटारा, विविध प्रकरणातून ३ कोटी ७५ लक्ष रुपयांची वसुली...

अनुसूचित जमातीच्या दारिद्य रेषे खालील आदिवासी घटकातील युवकांनी ऑटोमोबाईल प्रशिक्षण मिळविण्यासाठी अर्ज करावे. ..

अनुसूचित जमातीच्या दारिद्य रेषे खालील आदिवासी घटकातील युवकांनी ऑटोमोबाईल प्रशिक्षण मिळविण्यासाठी अर्ज करावे. ..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .

डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. . .