महाराष्ट्र शासन योजना

नागपूर येथे आदिवासी बांधवांसाठी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार..


पालघर दि 9 ऑगस्ट २०२२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 11 हजार 199 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये
11 हजार 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद


जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या.


यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच जिल्ह्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते.


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशात प्रथमच सर्वोच्च पदावर आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत ही बाब आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासन दुर्बल घटकांच्या विकासासाठी नियोजनबद्ध काम करत आहे. राज्यात 1 कोटी 5 लाख आदिवासी बांधव असून त्यांच्या प्रगतीवर शासन विशेष लक्ष देत आहे. आदिवासी समाजाचा राहणीमानाचा दर्जा उंचावून त्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी स्वातंत्र्य जनजाती क्षेत्र उपाययोजना राबविण्यात येत आहे. या उपाययोजनामध्ये राज्यातील 16 जिल्हे 68 तालुके 6 हजार 262 गावांचा समावेश असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


आदिवासी विकास विभागामार्फत शासकीय आश्रम शाळांमध्ये समूह योजनेअंतर्गत निवास, शिक्षण, भोजनासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 556 अनुदानित आश्रम शाळेतून जवळपास 2 लाख 50 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याशिवाय 494 शासकीय वसतीगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. 173 नामांकित निवासी शाळेच्या माध्यमातून 53 हजार 353 अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यात येत आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयं योजनेच्या माध्यमातून जवळपास 21 हजार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शासनामार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. आदिवासी समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी दिल्ली व पुणे येथे खाजगी संस्थांच्या सहकार्याने प्रशिक्षण देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये
11 हजार 199 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद…

नागपूर येथे आदिवासी बांधवांसाठी गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार.. पालघर दि 9 ऑगस्ट २०२२ : आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष ...

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

संभाजीनगर : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न ...

देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

देशाचा अमृत महोत्सव नवोपक्रमांनी साजरा करा…जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ‘स्वराज उत्सव’बाबत जागृती निर्माण करण्याचे आवाहन संभाजीनगर : देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष झाले. हा अमृत ...

”घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्‍या आयोजनाबाबत जिल्‍हाधिका-यांनी साधला लोकप्रतिनिधींशी संवाद…

अहमदनगर, 8 ऑगस्‍ट (सौजन्य – जिमाका वृत्तसेवा) – स्‍वातंत्र्याचा #अमृत महोत्‍सवा निमित्‍त 13 ते 15 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत संपूर्ण राज्‍यासह जिल्‍ह्यात ”#घरोघरीतिरंगा” हा ...

अकोले नगरपंचायत द्वारे “आजादी का अमृत महोत्सव” उपक्रमाचे आयोजन

अकोले ०८ ऑगस्ट २०२२ : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व स्वातंत्र्य संग्रामातील घडलेल्या ...

नेवासा तालुक्यातील नेवासा ते चिंचबनरोड (माळीवस्ती) जवळील रस्त्याच्या पुलाच्या १ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या कामाचे आज भुमीपुजन समारंभ करण्यात आला….

नेवासा तालुक्यातील नेवासा ते चिंचबनरोड (माळीवस्ती) जवळील रस्त्याच्या पुलाच्या १ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या कामाचे आज भुमीपुजन समारंभ करण्यात आला....

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत, नेवासा तालुक्यात चार हजार आठशे नोंदणी कृत कामगारांची नवीन नोंदणी…

महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत, नेवासा तालुक्यात चार हजार आठशे नोंदणी कृत कामगारांची नवीन नोंदणी...

आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बाल हक्क सप्ताह निमित्ताने सिंदगी आणि कळमकोंडा येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न…

आझादी का अमृत महोत्सव, आंतरराष्ट्रीय दत्तक महिना, बाल हक्क सप्ताह निमित्ताने सिंदगी आणि कळमकोंडा येथे जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन…

तोरणा गडावरील विद्युतीकरणाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उदघाटन...

जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन….

जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंकाचे प्रदर्शन....