महाराष्ट्र शासन योजना


मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

नाशिक, दिनांक : १४ जानेवारी २०२४ (वृत्तसेवा) :
आगामी पावसाळ्यात महत्वाकांक्षी मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आज येवल्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत साधारण 20 कोटी 39 लाख रुपयांच्या तीन रस्त्यांचे भूमिपूजनाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक माळुंदे, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, नायब तहसीलदार पंकज मगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवल्यातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आहेत. त्यासाठी सुमारे १५१ किलोमीटर पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव कालव्याचे अस्तरीकरण करण्यात येत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन जूनमध्ये मांजरपाड्याचे पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. ते काम नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

विकासात्मक कामांसाठी असणाऱ्या नागरिकांच्या मागण्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नागरिकांचे सर्वच प्रश्न मार्गी लावले जातील, असे मंत्री श्री भुजबळ यांनी सांगितले.

शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी – येवला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी प्रकल्प साकारण्यात येत आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रमुख सरदार आणि मावळ्यांचे म्युरलस लावण्यात येणार आहे. या भव्य दिव्य शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. त्यादृष्टीने या प्रकल्पाची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा सूचनाही मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.

या रस्त्यांचे झाले भूमिपूजन – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सायगांव येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत येवला-वडगांव बल्हे- बल्हेगांव- गोल्हेवाडी- सायगांव- न्याहारखेडा- रहाडी या ५ कोटी ८१ लाखांच्या रस्त्याचे, पिंपळखुटे तिसरे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत गोल्हेवाडी-नगरसुल-पिंपळखुटे तिसरे-तालुका हद्द या ५ कोटी ४७ लक्ष किमतीच्या रस्त्याचे तर शिरसगांव लौकी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक टप्पा-२ योजनेंतर्गत देशमाने-शिरसगांव लौकी- लौकी शिरसगांव- आडगांव रेपाळ या ९ कोटी ११ लाख किमतीच्या रस्त्याचे भुमीपूजन करण्यात आले.

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचा घेतला आढावा –सतत दुष्काळाच्या छायेत असलेल्या येवला तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्याच प्रयत्नांतून येवला तालुक्यातील धुळगावसह १७ गावे पाणी व राजापूरसह ४१ गावे पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनांच्या कामांचा मंत्री छगन भुजबळ यांनी आढावा घेताना, योजनेची कामे जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिक्षक अभियंता सुबोध मोरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येवल्यातील २० कोटी ३९ लाखांच्या ३ रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा / विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा / विभागांनी गतीने कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी / तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन

सागरी व्यापार क्षेत्रातील गुंतवणूकदारांना भारतात मोठी संधी: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी / तिसऱ्या ग्लोबल मेरीटाइम इंडिया समिट (GMIS) २०२३ चे उद्घाटन

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ – एकूण निर्णय-७

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.१० ऑक्टोबर २०२३ - एकूण निर्णय-७

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा – परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून तीर्थक्षेत्र विकासाचा आढावा - परळी वैजनाथ, घृष्णेश्वर आणि सप्तशृंगी देवी तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी व्हिजन २०३५ -  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे ...

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री ...

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ : जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील ...

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख....