राजकारण

भाजयुमो व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं पाठवणार पत्रे …

काय आहे प्रकरण – 

राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या “आम्हाला वाटतं की, कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल,” या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेली 10 लाख पोस्टकार्ड भाजयुमो कडून पाठवली जाणार आहेत. आता भाजयुमो च्या या अभियानाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसही उत्तर म्हणून, “जय भवानी जय शिवाजी” लिहून 20 लाख पोस्टकार्ड राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.

पत्रांस कारण की….

राज्यसभा खासदारांनी काल (22 जुलै 2020) शपथ घेतली. यावेळी भाजप नेते छत्रपती उदयनराजे भोसले यांनी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. शपथ घेऊन झाल्यावर त्यांनी ‘जय हिंद,जय महाराष्ट्र, जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. मात्र यानंतर सभापतींनी छत्रपती उदयनराजे भोसले ना समज दिली. “तुम्ही सदनात नवीन आहात, त्यामुळे सांगतो की, हे रेकॉर्डवर जाणार नाही, फक्त तुमची शपथ नोंदवली जाईल. सदनात कोणतीही घोषणा देण्याची मुभा नाही, हे भविष्यात लक्षात असू द्या’ असं व्यंकय्या नायडू म्हणाले होते.

…तर राजीनामा दिला असता: उदयनराजे यांची प्रतिकिया 

राज्यसभेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला नसून सभागृहात असा कुठलाही प्रकार झाला नसल्याचा खुलासा खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला आहे. उदयनराजे म्हणाले उपराष्ट्रपतींनी सांगितलेली बाब ही राज्यघटनेला धरून असल्यामुळे त्यामध्ये गैर काही नाही. उलट माझ्या घोषणेला आक्षेप घेणाऱ्या नेत्यांना उपराष्ट्रपतींनी रोखलं. यामध्ये उपराष्ट्रपतींनी काहीही गैर केलेलं नसून काही जण उगाच या गोष्टीला मोठे बनवत आहेत. तसेच विनाकारण नवीन वादाला तोंड फोडत आहेत. सभागृहात छत्रपतींचा अपमान झाला असता तर मी तिथेच राजीनामा देऊन बाहेर पडलो असतो. मात्र असे काहीही घडलेले नाही, अशी स्पष्टोक्ती छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल राज्यसभेवर खासदारकीची शपथ घेतल्यानंतर जय शिवाजी, जय भवानी अश्या घोषणा दिल्यामुळे त्यांना सभागृहात घोषणा न देण्याविषयी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी समज दिली असल्याचे वृत्त माध्यमांमध्ये आले होते. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली असतानाच खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याविषयी खुलासा केला आहे.

खा. छत्रपती उदयनराजे भोसले || शरद पवार || भाजयुमो व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं पाठवणार पत्रे …|| Sending Letters

भाजयुमो व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचं पाठवणार पत्रे … काय आहे प्रकरण –  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या “आम्हाला वाटतं ...

भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिल्याच्या गंभीर आरोपानंतर सचिन पायलट आक्रमक ||Sachin Pilot Latest News

भाजप पक्षात प्रवेश करण्यासाठी 35 कोटींची ऑफर दिल्याच्या गंभीर आरोपानंतर सचिन पायलट आक्रमक Mind4Talk गिरीराज मलिंगा यांनी सचिन पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले असून ...