शेती

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार


◼️संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषणा
◼️कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन
◼️संतांनी मानवकल्याणाचा संदेश दिला ही परंपरा पुढे चालू ठेवावी

मुळा धरणाच्या बॅक वाॅटरमधून पारनेर शहरातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर करण्यात येत असून या योजनेचे विद्युत देयक नियमितपणे भरावे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री क्षेत्र पिंपळनेर येथे केले.


पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संत निळोबारायांच्या राहत्या वाड्याचा जिर्णोद्धाराचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृह मंत्री दिलीप वळसे पाटील,जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, आ. निलेश लंके, चैतन्य महाराज देगलुरकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा आहे. संत परंपरेत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. संत साहित्य आपला अध्यात्मिक ठेवा आहे. संतांनी मानवकल्याणाची शिकवण दिली असून या विचारांवर महाराष्ट्र मार्गक्रमण करत आहे. ही परंपरा सर्वांनी पुढे चालू ठेवली पाहिजे.
पारनेर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेसंबधी सर्व प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना श्री. पवार यांनी यावेळी संबंधिताना केली. श्री क्षेत्र पिंपळनेरला प्रतीपंढरपूर म्हणून नावलौकिक मिळाला आहे. संत निळोबाराय मंदिर परिसरातील विविध विकास कामांसाठी तिर्थक्षेत्र विकास योजनेतून पन्नास लक्ष रुपयांची मदत देण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले .


कोरोनाकाळात आमदार निलेश लंके यांनी केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक करुन सर्वांनी शासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन्ही डोस घ्यावे असे आवाहन उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी केले.


गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले.
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत परंपरेत श्री निळोबारायांच्या स्थान अतिशय महत्त्वाचे असल्याचे आणि सर्वजण समान असून आपापसात कोणताही भेदभाव नाही ही शिकवण संत निळोबारायांनी दिल्याचे सांगितले.


आ. निलेश लंके यांनी प्रास्ताविकात श्री क्षेत्र पिंपळनेर येथील प्रस्तावित योजनांची माहिती दिली. पारनेर परिसरातील विकास कामे मंजूर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे सांगितले.


श्री संत निळोबाराय अभंग गाथेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्रीमहोदयांनी संत निळोबारायांच्या समाधीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाला ग्रामस्थ, भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुळा धरणातून पारनेर शहरासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार

◼️संत निळोबाराय देवस्थान ट्रस्टला विकास कामांसाठी पन्नास लक्ष रुपये मदतीची घोषणा ◼️कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ◼️संतांनी मानवकल्याणाचा संदेश दिला ही परंपरा पुढे चालू ठेवावी

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेऊन पुढील सूचना केल्या.. आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीचा जिल्हानिहाय आढावा घेऊन पुढील सूचना केल्या.. आजचा साक्षीदार | SAKSHIDAR

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पूर परिस्थतीत काय काळजी व खबरदारी घ्यावी… आजचा साक्षीदार | Sakshidar

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पूर परिस्थतीत काय काळजी व खबरदारी घ्यावी… आजचा साक्षीदार | Sakshidar

अतिवृष्टी व वीजा चमकत असल्यास काय दक्षता घ्यावी…आजचा साक्षीदार |Sakshidar

अतिवृष्टी व वीजा चमकत असल्यास काय दक्षता घ्यावी…

पीएम किसान योजने चे 2000 रुपये आपल्या बँक खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा… PM Kisan Yojana Complaint Number

पीएम किसान योजने चे 2000 रुपये आपल्या बँक खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा… PM Kisan Yojana Complaint Number

पीएम किसान योजने चे 2000 रुपये आपल्या बँक खात्यात आले नाहीत, तर लगेच ‘या’ क्रमांकावर तक्रार करा… PM Kisan Yojana Complaint Number

Sakshidar | राष्ट्रीय शास्वत शेती अभियान अंतर्गत “जमिन आरोग्य पत्रिका” येथे पहा (Soil Fertility-Index Maharashtra)

Sakshidar : राष्ट्रीय शास्वत शेती अभियान अंतर्गत "जमिन आरोग्य पत्रिका" हा केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यामंध्ये राबविण्यात येत आहे.

शेती विषयक माहिती || शेतकर्‍यांचे पाईपलाईन / पाणी पाटाचे हक्क || Farmers Rights for Water Pipeline for farming

शेती विषयक माहिती || शेतकर्‍यांचे पाईपलाईन / पाणी पाटाचे हक्क शेती विषयक माहिती || शेतकर्‍यांचे पाईपलाईन / पाणी पाटाचे हक्क || Farmers Rights of Water ...

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी मुळे भंडारदरा धरण भरले.. || Bhandardara Dam overflow due to Heavy Rain

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्य वृष्टी मुळे भंडारदरा धरण भरले.. || Bhandardara Dam overflow due to Heavy Rain  Shrirampur 24Tass : (Bhandardara Dam Overflow) भंडारदरा पाणलोट ...

Mind4Talk || आद्रक (आले) Ginger लागवड ते 60 दिवसाचे संपूर्ण नियोजन

  Mind4Talk || आद्रक (आले) Ginger लागवड ते 60 दिवसाचे संपूर्ण नियोजन – कृषीमुल्य#Ginger #AleLagwad #Shrirampur, #Shrirampur24Taas, #Sakshidar, #Mind4Talk #ShrirampurNews, #Sarvamat, #MazeShrirampur, #Sakshidar, #Mind4Talk==================================================== ...

हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 71 हजार 125 क्युसेक पाण्याचा विसर्ग | Hatnur Dam Water Open Video

  हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून 71 हजार 125 क्युसेक पाण्याचा विसर्ग | Hatnur Dam Water Open Video जळगाव जिल्ह्यातील तापी नदीवर ...