शेती

शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फक्त एक अर्ज... || MAHADBT - One Application for All Govt. Schemes


शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फक्त एक अर्ज… || MAHADBT – One Application for All Govt. Schemes 

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध अनुदान योजना राबविल्या जातात, त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नियम व अटिनुसार पात्र शेतकऱ्यांना विविध संकेत स्थळावरून ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरूपात अर्ज भरावा लागतो, तसेच विविध योजना ह्या शासनाच्या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत राबविल्या जात असल्या कारणाने योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही यामुळे योजनेसाठी पात्र असुनही फक्त योजनेची माहिती नसल्या कारणाने अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेण्यापासुन वंचित राहतात, त्यातच वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर नोंदणी करणे तसेच नोंदणी करण्याची पध्दत वेगवेगळी असायची यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनेचा लाभ घेणे खूपच किचकट बनले होते, 

शेतकऱ्यांना येणाऱ्या अशा विविध अडचणींचा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आता कृषी विभागा अंगर्तत येणाऱ्या जास्तीतजास्त विविध योजना https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या एकाच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत.

सध्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या कृषी योजनांची यादि खालील प्रमाणे आहे – 

अ) कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान

  • 1.         ट्रॅक्टर   
  • 2.         पॉवर टिलर       
  • 3.         ट्रॅक्टर / पॉवर टिलर चलित अवजारे           
  • 4.         बैल चलित यंत्र / अवजारे 
  • 5.         मनुष्य चलित यंत्र / अवजारे          
  • 6.         प्रक्रिया संच
  • 7.         काढणी पश्चात तंत्रज्ञान
  • 8.         फलोत्पादन यंत्र / अवजारे
  • 9.         वैशिष्ट्यपुर्ण यंत्र/ अवजारे
  • 10.       स्वयं चलित यंत्रे

ब) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

  • 1.         ठिबक सिंचन    
  • 2.         तुषार सिंचन

क) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान

  • 1.         शेततळे 
  • 2.         पंप संच 
  • 3.         पाईप    
  • 4.         बियाणे वितरण
  • 5.         एकात्मिक कीड व्यवस्थापन
  • 6.         एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

ड) बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी फक्त)

  • 1.         नवीन विहीर      
  • 2.         जुनी विहीर दुरूस्ती        
  • 3.         इनवेल बोअरींग पीव्हीसी पाईप
  • 4.         पंप संच 
  • 5.         वीज जोडणी
  • 6.         शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण
  • 7.         ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच  
  • 8.         परसबाग

इ) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना (अनुसूचित जाती प्रवर्गासाठी फक्त)

  • 1.         नवीन विहीर      
  • 2.         जुनी विहीर दुरूस्ती        
  • 3.         इनवेल बोअरींग पाईप
  • 4.         पंप संच 
  • 5.         वीन जोडणी
  • 6.         शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण
  • 7.         ठिबक सिंचन संच, तुषार सिंचन संच, पीव्हीसी 
  • 8.         परसबाग

फ) एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

  • 1.         उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकांची स्थापना करणे  
  • 2.         उतीसंवर्धन प्रयोगशाळा बळकटीकरण उत्पादकतेत वाढ करणे
  • 3.         नवीन उतीसंवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे
  • 4.         भाजीपाला विकास कार्यक्रम         
  • 5.         गुणवत्तापुर्ण लागवड साहित्य आयात करणे  
  • 6.         भाजीपाला, बियाणे प्रक्रिया, पॅकिंग, साठवण इ. पायाभूत सुविधा          
  • 7.         नवीन बागांची स्थापना करणे         
  • 8.         फलोत्पादन यांत्रिकीकरण
  • 9.         अळिंबी उत्पादन
  • 10.       पुष्प उत्पादन
  • 11.       मसाला पिके लागवड
  • 12.       जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवीकरण करून
  • 13.       नियंत्रित शेती घटक
  • 14.       सेंद्रिय शेती
  • 15.       एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिम कीड व्यवस्थापन
  • 16.       परागीकरणासाठी मधुमक्षिका पालन
  • 17.       एकात्मिक काढणी पश्चात व्यवस्थापन
  • 18.       फलोत्पादन पिकांसाठी पणन सुविधा स्थापन करणे
  • 19.       सामुहिक शेततळे

ज) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

  • 1.         फळबाग लागवड – आंबा, काजु, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबु, नारळ, सीताफळ, आवळा, चिंच, जाभुळ, कोकम, फणस, अंजीर, चिकु 
  • 2.         फळबागेसाठी ठिबक सिंचन संच 100 टंक्के अनुदान

महाराष्ट्र शासनाने विविध योजनांसाठी व शेतकऱ्यांच्या सुलभतेसाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळाची निर्मिती केली असुन या संकेतस्थळावर कृषी योजनां सोबतच पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती, मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, पेन्शन योजना, कामगार योजना, विशेष सहाय्य योजना अशा इतर योजनांचा महाराष्ट्रातील नागरिकांना लाभ घेता येणार आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिलेल्या या संकेतस्थळावर अर्जदाराला एकदाच नोंदणी करून वरील पैकी कोणत्याही हव्या त्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. 

शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फक्त एक अर्ज… || MAHADBT – One Application for All Govt. Schemes

शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी अनुदान योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फक्त एक अर्ज… || MAHADBT – One Application for All Govt. Schemes  महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागा ...

Shrirampur 24Tass |भंडारदरा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांवर | Bhandardara Dam Water Now 75 Percentage

भंडारदरा धरणाचा जलसाठा 75 टक्क्यांवर | Bhandardara Dam Water Now 75 Percentage  Shrirampur 24Tass : गेल्या काही दिवसापासून पाणलोट क्षेत्रात शांत असणाऱ्या पावसाने काल ...

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा सहावा हप्ता जमा … लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द… Beneficiaries List Updated

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा सहावा हप्ता जमा … लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द… Beneficiaries List Updated  कोरोनाच्या ...

नगर जिल्हा धरण पाणीसाठा || Updates of Storages of Dams in Nagar District

  नगर जिल्हा धरण पाणीसाठा || Updates of Storages of Dams in Nagar District                      ...

दूध भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्रीच टाकणार छापे..! || Major Action Against Those Who Adulterated Milk in Maharashtra

   Image Credit : Pixabay.com दूध भेसळ रोखण्यासाठी महाराष्ट्रातील मंत्रीच टाकणार छापे..! || Majo Action Against Those Who Adulterated Milk in Maharashtra महाराष्ट्र राज्यात दूध ...

शेतमालावर वखार महामंडळातर्फे “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेअंतर्गत मिळणार तारण कर्ज || Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna

शेतमालावर वखार महामंडळातर्फे “अभिनव ऑनलाईन शेतमाल तारण कर्ज” योजनेअंतर्गत मिळणार तारण कर्ज || Abhinav Online Shetmal Taran Karj Yojna  महाराष्ट्र राज्य वखार महामंडळातर्फे “अभिनव ...

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार || Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A

डिजिटल सातबारा पाठोपाठ आता गाव “नमुना 8-अ” चा उताराही ऑनलाइन मिळणार  Download Digital 7/12 Maharashtra & Namuna 8A : डिजिटल सातबारा पाठोपाठ आता जमिनीचा ...

Maharashtra Sarkari Yojna || मागेल त्याला शेततळी Magel Tyala Shettali या योजने बद्दल थोडक्यात

मागेल त्याला शेततळी Magel Tyala Shettali या योजने बद्दल थोडक्यात  कोरडवाहू शेतकर्‍यांना आपल्या शेतजमिनीवर पिके घेताना पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. तसेच काही शेतजमिनींवर विहिरीसुद्धा ...

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना – महावितरण || Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana – Mahadiscom

  मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना  राज्यात ‘अटल‘ सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार ...

PM किसान योजनेचा पाचवा हप्ता जमाः अशी पहा यादी, जाणून घ्या तुमच्या खात्याची स्थिती!

काही दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतिक्षा असलेला पीएम किसान योजनेचा पाचवा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत ...