शेती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

शिर्डी, दि.१४ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

कृषी विभागाची विविध कामे, शेततळे, गॅबियन बंधारे, ड्रीप स्प्रिन्क्लर सिंचन, खोलीकरण करणे, पाणीसाठा वाढविणे, पाझर तलावातील गाळ काढणे, नवीन सिमेंटचे बांध बांधणे, जून्या नाल्यांचे पुनरूज्जीवन करून त्यांना उर्जित आवस्था प्राप्त करून देणे या कामांची या शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून चर्चा करण्यात आली.

राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व ‍जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये शिवार फेऱ्या काढण्यात आल्या. पाथरे बु., तिसगाव, लोणी बु, रांजणगाव खु, सावळीविहीर बु हनुमंतगाव, लोहगाव, हसनापूर, सावळीविहीर खु, ममदापूर, भगवतीपूर, दुर्गापूर, नांदुर्खी खु, नांदुर्खी बु , साकुरी ,दाढ बु, रांजणखोल, नांदूर बु , अस्तगाव, डोऱ्हाळे व शिंगवे या गावांची जलयुक्त शिवार योजना २.० साठी निवड करण्यात आली आहे.

शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब शिंदे, पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता देविदास धापटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, जलसंधारण अधिकारी, ग्रामसेवक, वनरक्षक यांच्या समन्वयातून सर्व गावात नियोजनबद्धरित्या शिवार फेऱ्या पार पडल्या. ह्या शिवार फेरीत गावातील सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या वतीने जलसंधारणासह विविध कामे सुचविण्यात आली.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार | शेतकऱ्यांनी गाळ काढण्यासाठी अर्ज करावे

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानामुळे धरण/ तलावातील गाळ उपसून तो शेतात पसरविल्यास कृषी उत्पादनात वाढ होण्यासोबतच धरणाची/ तलावाची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापित होण्यास मदत होणार आहे. यासाठी ज्या गावाच्या परिसरात धरण/तलाव आहे आणि त्यामध्ये मोठया प्रमाणात गाळ आहे.

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध | समाजमाध्यमातील अफवांवर विश्वास न ठेवण्याचे कृषि विभागाचे आवाहन

महा-डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याची सुविधा २४ तास उपलब्ध असून समाजमाध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातच उपलब्ध

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी

खरीप हंगाम 2023-24 साठी जिल्हयात मुबलक प्रमाणात रासायनिक खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने नियोजन केले आहे. पीक संरचनेतील बदल व खत वापराच्या शिफारशी प्रमाणे जिल्हयासाठी एकुण 89 हजार 318 मे.टन रासायनिक खताची मागणी करण्यात आली असून 80 हजार 180 मे.टन खताचे आवंटन व 28 हजार 350 बॉटल नॅनो युरीयाचे आवंटन शासनाकडून प्राप्त झाले आहे. रब्बीतील सुमारे 29 हजार 526 मे.टन साठा जिल्हयामध्ये शिल्लक आहे.

दहा वर्षापूर्वी काढलेले आधार कार्ड अद्यावत करा; जिल्हाधिकारी यांचे आवाहन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना तसेच शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते.

SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT (SIPM) | JOBS IN POULTRY | सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट | पोल्ट्री क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT (SIPM) | JOBS IN POULTRY | सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट | पोल्ट्री क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी…

सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही भारतातील तमिळनाडू, उधमलपेठ (Udumalpet) येथे स्थित पोल्ट्री प्रशिक्षण संस्था आहे. 2012 मध्ये सुगुणा ग्रुप या भारतातील आघाडीच्या पोल्ट्री कंपनीने त्याची स्थापना केली आहे. सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही संस्था कुक्कुटपालनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देते, ज्यामध्ये कुक्कुट व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम, कुक्कुटपालनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि ब्रॉयलर आणि लेयर फार्मिंगमधील अल्पकालीन अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना पोल्ट्री उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) च्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आलेली आहे.