मागेल त्याला शेततळी Magel Tyala Shettali या योजने बद्दल थोडक्यात
कोरडवाहू शेतकर्यांना आपल्या शेतजमिनीवर पिके घेताना पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. तसेच काही शेतजमिनींवर विहिरीसुद्धा नसतात आणि मराठवाडा व विदर्भात या भागात तर परिस्थिती हि फार हलाखीची असते. खान्देशातील जळगाव, धुळे व नंदुरबार हे जिल्हे देखील या पाणी टंचाई च्या या परिस्थितीतून सुटलेले नाहीत. त्यामुळे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीसाठी पूरक व्यवस्था म्हणून ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेकडे पाहिले जाते.
मागेल त्याला शेततळी या योजनेचा लाभ वैयक्तिक व सामुदायिक अशा दोन प्रकारे घेता येतो. सामुदायिक शेततळ्याचा लाभ घेताना लाभार्थ्यांनी रुपये १०० च्या बॉंडवर अर्ज सादर करणे बंधनकारक असते. आत्महत्या ग्रस्त व दारिद्र्यरेषेखालील शेतकर्यांना प्राधान्य असल्यामुळे त्याविषयीचे प्रमाणपत्र अर्ज सादर करणे हे अर्जदारास बंधनकारक आहे, ‘आपले सरकार’ वेबसाईट वर आपली स्वत:ची प्रोफाईल तयार करून महा-ई सेवा केंद्रातूनच मागेल त्याला शेततळे या योजनेचा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. या योजने मध्ये कोकण विभाग वगळता इतर जिल्ह्याकरिता लक्ष्यांक, अर्जदार शेतकर्याकडे किमान १.५ एकर (०.६० हेक्टर) जमीन धारणा असणे गरजेचे आहे. त्या अर्जदार शेतकर्याची जमीन तांत्रिकदृष्ट्या योग्य असावी आणि त्याने यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून शेततळ्याचा लाभ घेतलेला नसावा. तसेच त्याची मागील पाच वर्षात पैसेवारी ५०% पेक्षा कमी किमान एक वर्ष तरी घोषित झालेली असावी. दारिद्र्यरेषे खालील कुटुंब व आत्महत्या ग्रस्त वारसास व वय ज्येष्ठता यादीनुसार पात्र लाभार्थ्यास प्राधान्य देण्यात आले आहे. शेत तळ्यासाठी किमान आकारमान इनलेट आऊटलेटसह १५ बाय १५ बाय ३ मी. ते ३० बाय ३० बाय ३ तसेच इनलेट आऊटलेट विरहित शेत तळ्यासाठी आकारमान किमान १५ बाय १५ बाय ३ मी. ते २० बाय १५ बाय ३ मी. असणे बंधनकारक ठरवले आहे. तसेच पात्र अनुदान रकमे व्यतिरिक्त उर्वरित सर्व खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे बंधनकारक राहील, असे काही निकष लावण्यात आले आहेत.
मागेल त्याला शेततळे – दिनांक 9 फेब्रुवारी, 2016 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ”मागेल त्याला शेततळे” योजना मंजूर आणि महाराष्ट्र राज्य जलसंधारण महामंडळासाठी 10,000 कोटीची तरतुद केलेली आहे.
“मागेल त्याला शेततळे” योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी “मागेल त्याला शेततळे” योजना राबवण्यात येत आहे.
अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे. Documents For Magel Tyala Shettale Yojna
- जातीचा दाखला
- ७/१२ चा उतारा
- ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
- आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
- दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
- स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
- आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)
शेततळ्या साठी अटी / नियम : Rules of Magel Tyala Shettale Yojna
- शेततळ्यासाठी ठिकाण हे कृषि विभागाचे कृषी सहाय्यक / कृषि सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणीच शेततळे घेणे बंधनकारक असेल.
- कार्यारंभ आदेश मिळाल्या पासून शेततळ्याचे काम तीन (3) महिन्यात पूर्ण करणे बंधनकारक राहील .
- लाभार्थींना स्वतःचे राष्ट्रीयकृत बँक / इतर बँकेतील खाते क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक / कृषी सेवक यांकडे पासबुकच्या झेरॉक्स प्रतीसह सादर करावा .
- कामासाठी कोणतीही आगाऊ (अडवान्सड) रक्कम मिळणार नाही .
- शेततळ्याच्या बांधावर व पाण्याच्या प्रवाहाच्या भागामध्ये स्थानिक प्रजातीच्या वनस्पतींची लागवड करावी.
-
शेततळयाची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाचे आहेत.
- शेततळ्याची निगा व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित शेतकर्याचीच राहील किंवा शेत तळ्यासाठी शेतकरी हाच जबाबदार असेल.
- पावसाळ्यात तळ्यात गाळ वाहून येणार नाही अथवा साचणार नाही यासाठी व्यवस्था लाभार्थ्याने स्वत करावी .
- लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक आहे .
- मंजूर आकार मानाचे शेततळे खोदणे हे बंधनकारक राहील.
- शेत तळ्याला इनलेट आउटलेट ची सोय असावी .
- शेत तळ्यासाठी प्लास्टिक अस्तरिकरण अर्जदाराला स्वखर्चाने करावे लागेल.
या योजनेतर्गत पुढील पैकी कोणतेही एका आकारमानाच्या शेततळ्याची शेतकऱ्यास मागणी करता येईल.यामध्ये जास्तीत जास्त 30X30X3 मी आकारमानाचे व कमीत कमी 15X15X3 मी (इनलेट,आउटलेट सह) तर 20X15X3 मी (इनलेट विरहीत)आकारमानाचे शेततळे शेतकऱ्यास घेता येईल. यामध्ये लाभार्थीची मागणी व शेत जमीन परिस्थिती नुसार शेततळ्याची लांबी रुंदी कमी जास्त करण्यास मुभा राहील आणि मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे. शेततळ्याच्या आकारमाना नुसार देय अनुदान रक्कम वेग वेगळी असली तरी देय अनुदानाची कमाल रक्कम रु.५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार फक्त) इतकी राहील.रु.५०,०००/- (अक्षरी पन्नास हजार फक्त) पेक्षा जास्त येणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करावयाचा आहे. योजनेतर्गत जास्तीत जास्त पाच (५) शेतकऱ्यांचा गट करून त्यांना एकत्रितरित्या समुदायिक शेततळे घेता येईल मात्र या शेततळ्याचे आकारमान अनुज्ञेय आकाराच्या प्रमाणात राहील. लाभार्थी शेतकऱ्यास स्वतः/ मजुराद्वारे /अन्य पर्यायी साधनांच्या (जेसीबी / पोकलेन या मशीन) साहयाने आपले शेततळे पूर्ण करता येईल. काम पूर्ण झाल्यानंतर अनुदान सबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.
मागेल त्याला शेततळी (Magel Tyala Shettali) बद्दल अधिक माहितीसाठी खालील शासन निर्णय वाचा
मागेल त्याला शेततळी (Magel Tyala Shettali) योजनेबाबत इतर माहिती
जिल्हा पातळीवर मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती, या योजनेवर देखरख करेल. योजना अंमलबजावणी, संनियंत्रण व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती असेल. तालुका पातळीवर समिती शेततळयाला मान्यता देईल. शेततळी बांधण्यासाठी मशिनचा वापर अनुज्ञेय आहे. ”मागेल त्याला शेततळे” योजना कृषि आयुक्तालया मार्फत राबविण्यात येणार आहे. शेततळयाचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून ही योजना कार्यान्वीत करीत आहे.
(( सूचना – योजनेची संबधीत माहिती हि संग्रहित स्वरूपाची असून, योजनेचा लाभ घेण्यापूर्वी संबंधीत विभागाशी संपर्क करून माहिती घेऊनच त्याच्या सूचनेनुसार अर्ज करावा. ))