Sakshidar : राष्ट्रीय शास्वत शेती अभियान अंतर्गत “जमिन आरोग्य पत्रिका” हा केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी कार्यक्रम महाराष्ट्र व इतर राज्यामंध्ये राबविण्यात येत आहे. सन २०१५ ते २०१७ या कालावधीत एकुण २७.२२ लाख मृदा नमुन्यांची तपासणी करून त्याव्दारे १३१.५४ तसेच सन २०१७ ते २०१९ या कालावधीत एकुण २७.९३ लाख मृदा नमुन्यांची तपासणी करून त्याव्दारे १३०.६८ लाख मृदा आरोग्य पत्रिकांचे शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेले आहे. मृदा नमुन्या साठी जिरायत क्षेत्रासाठी १० हेक्टर क्षेत्रातुन एक व बागायत क्षेत्रासाठी २.५० हेक्टर क्षेत्रातुन एक या ग्रीड पध्दतीने मातीचे नमुने घेण्यात आलेले आहेत. (Soil Fertility Index Maharashtra)
तपासणी केलेल्या जमीन / मृदा नमुन्यांचे निष्कर्ष केंद्र शासनाने विकसित केलेल्या “Soil Health” या संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात आलेले आहे. या मोठ्या प्रमाणात उपलब्द असणाऱ्या सांख्यिकी महितीचा उपयोग शेतकऱ्यां ना विविध माध्यमातुन वेळोवेळी कृषि सल्ला देण्यासाठी होणार आहे. याचाच एक भाग म्हणुन संगणक प्रणालीवर उपलब्ध असलेल्या माहितीवर योग्य ती शास्त्रिय व तांत्रिक प्रक्रीयेव्दारे जिल्हानिहाय व तालुकानिहाय नत्र, स्फुरद, व पालाश या मुलद्रव्यांचे जमिन सुपिकता निर्देशांक व त्यावर आधारीत त्या मुलद्रव्यांची जमिनीतील उपलब्धता, तसेच सुक्ष्म मुलद्रव्ये बोरॉन, जस्त, लोह, सल्फर व तांबे यांची कमतरता स्थितीची माहिती तयार करण्यात आलेली आहे. व तसेच सरकार तर्फे सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील जमिनींचे सुपिकता निर्देशांक कळविण्यात आलेले आहेत. (Soil Fertility Index Maharashtra)
“जमिन आरोग्य पत्रिका” योजनेच्या “Soil Health” या संगणक प्रणालीवर उपलब्ध असलेल्या गावनिहाय माहितीच्या आधारे जमिन सुपिकता निर्देशांक तयार करून कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच इतर मोठ्या प्रमाणात उपलब्द असणाऱ्या सांख्यिकी महिती तिथे आपणास पाहावयास मिळेल. तसेच कृषि सहाय्यकांच्यामार्फत गावनिहाय फ्लेक्स बोर्डव्दारे माहिती प्रदर्शित करून त्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जेणेकरून गावातील शेतकऱ्यांना पिकांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास सदरील माहितीचा उपयोग होईल. (Soil Fertility Index Maharashtra)