SBI :: सावधान आणि अलर्ट राहून सायबर – क्रिमिनल्स पासून आपली सुरक्षा करा.
गेल्या काही लॉकडाऊन दिवसांपासून ऑनलाइन स्कॅमर्स युजर्सच्या बँक अकाउंटच्या डिटेल्सची चोरी करण्यासाठी नवीन नवीन पद्धत अवलंबित आहेत आणि त्याचा उपयोग सायबर गुन्हेगारी साठी वापरात आहे. बँकिंग सेक्टर सध्या हॅकर्सच्या हिटलिस्टवर असल्याने अनेकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. सायबर गुन्हेगारी सध्या अनेकांची चिंता वाढवणारी गोष्ट आहे. बँकिंग ऑनलाइन फ्रॉडची वाढत्या घटना वेगाने वाढत आहेत त्याचबरोबर डिजिटल पेमेंट्स सुद्धा वेगाने वाढत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाने इंटरनेट बँकिंग ट्रान्झॅक्शन साठी आपल्या ट्विटर अकाउंटवरून काही टिप्स बँकेच्या ग्राहकांसाठी दिल्या आहेत. ४५ सेकंदाच्या या व्हिडिओत एसबीआयने सुरक्षित ऑनलाइन बँकिंगच्या टिप्स सांगितल्या आहेत. याआधीही एसबीआयने आपल्या ग्राहकांसाठी सेफ नेट बँकिंग साठी टिप्स दिल्या आहेत.
Protect yourself from cyber-criminals by staying alert and informed. Here’s what you can do to stay safe..
एसबीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओत वेगवेगळी वेळ दाखवण्यात आली आहे. जाणून घ्या यासंबंधी….
>> जर तुम्हाला कोणताही फ्रॉड कॉल, ईमेल आणि टेक्स्ट मेसेज मिळाल्यास त्या लक्षपूर्वक वाचा. त्यात अर्जंट पेमेंट करण्यास सांगितले जावू शकते.>> तुमच्या बँक अकाउंटमध्ये असा व्यवहार दिसतील जो तुम्ही केला नाही.>> जर तुम्ही कोणासोबत सुद्धा माहिती किंवा अकाउंट संबंधीत माहिती शेयर केली असेल.>> एसबीआयने नेट बँकिंगचा वापर करणाऱ्या खातेदारांना सल्ला दिला आहे की, बँकिंग सायबर फ्रॉड प्रकरणी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग किंवा पोलिस स्टेशना जावून तात्काळ गुन्हा दाखल करा.>> तसेच देशाची सर्वात मोठी सरकारी बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडिया चे म्हणणे आहे की, सायबर क्राईम छोट्याशा घटनेला सुद्धा लपवू नका. तात्काळ याची तक्रार संबंधितांन द्या आणि गुन्हे दाखल करा.>> एसबीआयने आपल्या ट्विटर हॅन्डल मध्ये लिहिले आहे कि, सावधान आणि अलर्ट राहून सायबर – क्रिमिनल्स पासून आपली सुरक्षा करा.>> सायबर गुन्हेगारी पासून सुरक्षित राहण्यासाठी तुम्ही काय करू शकता. आणखी डिटेल्स माहिती साठी https://cybercrime.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
तात्काळ याची तक्रार संबंधितांन द्या आणि गुन्हे दाखल करा
नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल भारत सरकारचे सायबर गुन्हेगारी कमी करण्याचे एक पाऊल आहे. या अंतर्गत पीडित व्यक्ती किंवा तक्रारदार सायबर क्राईमची तक्रार नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल वर ऑनलाइन नोंदवू शकतात. हे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल पोर्टल देशाचे गृहमंत्रालयाच्या अधिकाराखाली काम करते आहे.
Protect yourself from cyber-criminals by staying alert and informed. Here’s what you can do to stay safe. For more details, please visit: https://t.co/PBljl1ygD1#SBI #StateBankOfIndia #Cybercrime #OnlineFrauds #FinancialFrauds #StayAlert #StaySafe #OnlineSafety pic.twitter.com/1ZlOJkINMN
— State Bank of India (@TheOfficialSBI) July 17, 2020