आज पोल्ट्री उद्योगामध्ये उच्चस्तरीय प्रगती साध्य करू इच्छिणाऱ्या पात्र तरुण व तरुणींसाठी असंख्य नोकरीच्या संधी पोल्ट्री क्षेत्रामध्ये आहे. परंतु सध्या या पोल्ट्री क्षेत्रात कार्यरत असलेले कार्यबल मोठ्या प्रमाणात अकुशल आहे. पोल्ट्री क्षेत्रामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणात कंपन्या कार्यरत आहेत. त्याकरिता संबंधित कंपन्यांमध्ये पोल्ट्री उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, फीड मिलिंग, हॅचरी ऑपरेशन, पोषण, मार्केटिंग, पोल्ट्री उत्पादने निर्माण व विक्री, संशोधन आदी क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध असून, त्याकरिता कुशल तरुण व तरुणींची गरज आहे. पोल्ट्री क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कंपन्यांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्याचे काम SIPM (SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT) ही संस्था डिप्लोमा आणि डिग्री कोर्सच्या माध्यमातून करत आहे.
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही भारतातील तमिळनाडू, उधमलपेठ (Udumalpet) येथे स्थित पोल्ट्री प्रशिक्षण संस्था आहे. 2012 मध्ये सुगुणा ग्रुप या भारतातील आघाडीच्या पोल्ट्री कंपनीने त्याची स्थापना केली आहे. सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही संस्था कुक्कुटपालनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देते, ज्यामध्ये कुक्कुट व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम, कुक्कुटपालनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि ब्रॉयलर आणि लेयर फार्मिंगमधील अल्पकालीन अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना पोल्ट्री उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) च्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आलेली आहे.
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम देखील देते जे विद्यार्थ्यांना कुक्कुटपालनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळवण्यास सक्षम करतात. संस्थेमध्ये पोल्ट्री हॅचरी, ब्रॉयलर आणि लेयर फार्म, फीड मिल यांबाबत माहिती देण्यासाठी आणि प्रयोगशाळा यासारख्या आधुनिक सुविधा आहेत, जे विद्यार्थ्यांना एक आदर्श शिक्षण वातावरण प्रदान करतात.
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) तामिळनाडू मधील अलगप्पा विद्यापीठ, कराईकुडी शी सहयोगी कार्यक्रमांतर्गत संलग्न आहे आणि तामिळनाडू सरकारद्वारे मान्यताप्राप्त आहे. सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) संस्थेकडे अनुभवी प्राध्यापकांची एक टीम आहे जी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देतात. सदरील अभ्यासक्रम ‘सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट पोस्ट बॉक्स क्र.44, 23/A, 24, चिन्नाप्पानुथु गाव, पोस्ट – सलामरथुपट्टी, अनाईमलाई रोड, तालुका – उदुमलपेट, जिल्हा -तिरुपूर, तमिळनाडू – ६४२ २०७’ या ठिकाणी चालविला जातो.
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये शिकवले जाणारे अभ्यासक्रम व त्याचा कालावधी पुढीलप्रमाणे आहे :
- B.Sc. पोल्ट्री सायन्स | B.Sc., Poultry Science (अभ्यासक्रम कालावधी – 3 वर्षे)
- डिप्लोमा इन कमर्शियल ब्रॉयलर प्रोडक्शन मॅनेजमेंट | Diploma in Commercial Broiler Production Management (अभ्यासक्रम कालावधी – १ वर्षे)
- ब्रॉयलर ब्रीडर उत्पादनात डिप्लोमा | Diploma in Broiler Breeder Production (अभ्यासक्रम कालावधी – १ वर्षे)
- पोल्ट्री हेल्थ डिप्लोमा | Diploma in Poultry Health (अभ्यासक्रम कालावधी – १ वर्षे)
वरील अभ्यासक्रमामध्ये ब्रॉयलर/ब्रीडर हाउसिंग आणि पर्यावरण, ब्रॉयलर/ब्रिडर मॅनेजमेंट, ब्रॉयलर/ब्रिडर न्यूट्रिशन, फीडिंग आणि फीड मिल टेक्नॉलॉजी, जैव-सुरक्षा, शवविच्छेदन, ब्रॉयलर/ब्रीडर रोग, ब्रॉयलर यासारख्या विस्तृत विषय शिकवले जातात. ब्रॉयलर/ब्रीडर इकॉनॉमिक्स आणि मार्केटिंग इ. आवश्यक विषयाचे प्रात्यक्षिक वर्ग प्रयोगशाळेत तसेच सुगुणाच्या पोल्ट्री फार्ममध्ये घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन मिळावे तसेच अभ्यासक्रम लवकरात लवकर समजला जावा.
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये प्रवेशासाठी पात्रता: +2 /HSC/PUC/इंटरमीडिएट किंवा इतर कोणतेही समतुल्य अभ्यासक्रमामध्ये सरासरी 45% गुण असणे आवश्यक आहे तसेच वयाची मर्यादा हि पदविका आणि पदवी अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त 27 वय वर्षे इतकी आहे.
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये प्रवेशासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे –
- +2 /HSC/PUC/इंटरमीडिएट किंवा इतर कोणतेही समतुल्य अभ्यासक्रम गुणपत्रिका (मूळ)
- शाळा सोडल्याचा दाखला
- कोणतेही राष्ट्रीय ओळख दस्तऐवज
- पासपोर्ट आकाराचा फोटो (5 प्रती)
- फी भरण्याची पावती
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये गुणवत्ता शिष्यवृत्ती : +2 /HSC/इंटरमीडिएट मध्ये 60% पेक्षा जास्त गुण असलेले विद्यार्थी प्रवेश-स्तरावर गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत आणि त्यानंतरच्या सत्रांमध्ये 75% गुण असलेले विद्यार्थी गुणवत्ता शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. तसेच सुगुणा फूड्स कंपनीशी विविध मार्गाने म्हणजेच जसे कि, सुगुना कंपनीचे शेतकरी, विक्रेते चे यांच्या पाल्यांसाठी फीस मध्ये विशेष सवलत योजना देखील राबविली जाते.
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये “शिकत असताना कमवा” उपक्रम : SIPM विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेला प्रोत्साहन देते आणि बहुतेक विद्यार्थी ग्रामीण पार्श्वभूमीतील असतात त्यामुळे त्यांच्या पालकांवरील आर्थिक भार कमी होवा ह्या हेतूने बीएससीच्या अंतिम वर्षाच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यां साठी “शिकत असताना कमवा” हा उपक्रम राबविला जातो. ह्या मध्ये SIPM कडून छात्रवृत्ती (stipend) देण्यात येतो.
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये अतिरिक्त अभ्यासक्रम उपक्रम: SIPM मध्ये मुख्य अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य समृद्ध करण्याकरिता खालील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुद्धा राबविण्यात येतात, त्यामुळे त्याचा देखील फायदा हा विध्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात होतो.
- हिंदी स्पिकिंग अभ्यासक्रम
- व्यवसाय संप्रेषणात्मक इंग्रजी अभ्यासक्रम
- मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन – एमएस एक्सेल, पीपीटी, वर्ड अभ्यासक्रम
SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT मध्ये हॉस्टेल व मेस सुविधा : सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) बरचसे विद्यार्थी हे भारताच्या विविध राज्यातून विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात त्यामुळे विद्यार्थ्यांना राहण्यासाठी व खाण्यासाठी कॅम्पस मध्ये हॉस्टेल व मेस सुविधा स्वस्त दरात उपलब्द आहे.
प्रवेशासाठी किंवा अधिक माहिती साठी संपर्क : सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) बाबत अधिक माहिती किंवा प्रवेशासाठी महाराष्ट्रातील पात्र व इच्छुक विध्यार्थी खालील दोन्ही ठिकाणी संपर्क साधू शकतात –
सुगुना फूड्स प्रा. लिमिटेड,
२६३, विजय चेम्बर्स, महात्मानगर,
नाशिक – ४२२ ००७
मोबाइल नंबर – ९३२६ ०३३ ७०९ / ७३९७ ७२१ ७०२
किंवा
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट
(अभ्यासक्रम या ठिकाणी चालविला जातो)
पोस्ट बॉक्स क्र.44,23/A, 24, चिन्नाप्पानुथु गाव, पोस्ट – सलामरथुपट्टी ,
अनाईमलाई रोड, तालुका – उदुमलपेट,
जिल्हा -तिरुपूर, तमिळनाडू – ६४२ २०७ (मोबाइल नंबर – ९३२६ ०३३ ७०९ / ७३९७ ७२१ ७०२)
सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट बद्दल काही अतिरिक्त माहिती अशी आहे:
- सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) संस्थेने आपल्या विद्यार्थ्यांना पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये १००% प्लेसमेंटच्या संधी उपलब्ध करून देत आहे. तसेच SIPM ने आपल्या विद्यार्थ्यांना देशात व देशाबाहेर आत्तापर्यंत १००% प्लेसमेंट दिलेली आहे.
- सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) मध्ये एक संशोधन आणि विकास विभाग आहे जो पोल्ट्री उद्योगासाठी नवीन तंत्रज्ञान आणि पद्धती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करतो.
- पोल्ट्री क्षेत्रातील योगदानाबद्दल सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) संस्थेला अनेक पुरस्कार आणि मान्यता प्राप्त झाल्या आहेत. 2017 मध्ये, सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ला भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून “सर्वोत्कृष्ट पोल्ट्री प्रशिक्षण संस्था” म्हणून पुरस्कार मिळालेला आहे
- सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) पोल्ट्री शेतकरी, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांसाठी कार्यशाळा, परिसंवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम देखील आयोजित करते ज्यामुळे त्यांना पोल्ट्री क्षेत्रातील नवीनतम ट्रेंड आणि तंत्रज्ञान अद्ययावत ठेवता येते.
- इच्छुक पोल्ट्री उद्योजकांना पोल्ट्रीचे ज्ञान आणि उद्योजक बनण्यासाठी SIPM चे डिप्लोमा आणि डिग्री कोर्स हे महत्त्वपूर्ण ठरतात.
- संस्थेचे माजी विद्यार्थ्यांचे जाळे मजबूत आहे आणि तिचे अनेक माजी विद्यार्थी यशस्वीपणे स्वतःचे पोल्ट्री फार्म चालवत आहेत किंवा पोल्ट्री उद्योगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करत आहेत.
- पोल्ट्री सायन्स आणि मॅनेजमेंटशी संबंधित पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंधांसह सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) कडे सुसज्ज ग्रंथालय आहे. संस्थेकडे संगणक प्रयोगशाळा आणि ई-लर्निंग आणि ऑनलाइन प्रशिक्षणासाठी मल्टीमीडिया कक्ष देखील आहे.
एकूणच, सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट ही एक उत्तम संस्था आहे जी कुक्कुटपालन आणि व्यवस्थापनामध्ये सर्वसमावेशक शिक्षण आणि प्रशिक्षण प्रदान करते. त्याच्या आधुनिक सुविधा, अनुभवी प्राध्यापक आणि व्यावहारिक प्रशिक्षण कार्यक्रम पोल्ट्री उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श पर्याय बनवतात. आपण असे म्हणू शकतो कि, सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट ही एक सुस्थापित पोल्ट्री प्रशिक्षण संस्था आहे जी पोल्ट्री उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि व्यावहारिक प्रशिक्षण देते. इच्छुक पोल्ट्री उद्योजकांना पोल्ट्रीचे ज्ञान आणि उद्योजक बनण्यासाठी SIPM चे डिप्लोमा आणि डिग्री कोर्स हे महत्त्वपूर्ण ठरतात.