महाराष्ट्र पर्यटन

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

साधारण ८-१० दिवसांपूर्वीची घटना आहे ही… माझी आई, भाऊ, त्याची लहान साडेतीन वर्षाची मुलगी आणि भावाचे 2 मित्र अणदूर जवळील चिवरी महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून सोलापूरकडे येत असताना, भर दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ईटकळ गावाच्या पुढे सोलापूरच्या दिशेने 1 किलोमीटर अंतराच्या हायवेवर गाडी पुढे गेली असताना, एक उंच, काळाकुट्ट, भयंकर दिसणारा माणूस रस्त्याच्या मधोमध हातामध्ये भला मोठा जाड राॅड घेऊन आमच्या गाडीच्या अगदी समोर गाडी अडवत येऊन उभा राहिला. गाडी भाऊ ड्राईव्ह करत होता. त्याला पाहिल्यानंतर भावाला प्रचंड भीती वाटली. त्याला लक्षात आले की हा माणुस आता आपल्याला अडवून लूटमार करणार. तो गाडी तसाच चालवत पुढे निघाला होता. पण नविन kia seltos च्या ADAS फीचर्सच्या Auto Emergency Breaks या नवीन फीचरमुळे ती व्यक्ति समोर आल्यामुळे अचानक जोरात break लागून गाडी जागेवर थांबली. गाडीचा स्पिड खुप जास्त होता तेवढ्याच जास्त स्पिड मध्ये गाडी जागेवर थांबली. त्यामुळे गाडीत बसलेल्या बाळाला, आईला वगैरे थोडा मार लागला. लागलीच तो दरोडेखोर समोरच्या बोनेटवर काच फोडण्यासाठी म्हणून चढला. आणि त्याने आजूबाजूला शेतात लपलेल्या त्याच्या साथीदारांना आवाज देऊन बोलवले.

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

लगेच शेतामध्ये लपलेले ६-७ दरोडेखोर हातामध्ये चाकू, कुऱ्हाड, तलवारी आणि राॅडसारखी भयानक शस्त्र घेऊन गाडीवर हल्ला चढवू लागले. मोठा दगड घेऊन मागच्या सीटवर माझी आई बसली होती. तिथे तिच्या साईडला काचेवरती त्यांनी टाकला. पण काच फुटली नाही. त्यामुळे ते आणखी जास्तच चवताळले. त्या रोडवर पुढे आणि पाठीमागे साधारण 1 किलोमीटर पर्यंत तरी कुठलीच गाडी किंवा कोणतेच वाहन तिथे नव्हते. मात्र आम्ही सोलापूरच्या दिशेकडे निघालेलो होतो. पलीकडे उमरग्याच्या दिशेला जाणारे एक ट्रक ही असाच दरोडा टाकून त्यांनी उभा केला होता. आणि त्यांना सुद्धा प्रचंड मारहाण सुरू होती. आमच्या गाडीच्या समोर उभा असणारा माणूस काचा उघडा, गाडीचा दरवाजा उघडा म्हणून जोरजोरात धमकाऊ लागला. आजूबाजूने हल्लेखोर चाकू, कोयता, कुऱ्हाडी आणि काठ्या घेऊन गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न करतच होते. गाडीत बसलेले सगळेच प्रचंड घाबरले होते. तेवढ्यात एकाने पाठीमागे जाऊन मागची काच फोडली. त्याच क्षणी समोर असलेला दरोडेखोर आणि इतर सगळेच पाठीमागून गाडीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी माझ्या भावाने समोरून दरोडेखोर सरकल्यामुळे गाडी स्पीडमध्ये पुढे नेली आणि फास्ट पळवत सोलापूरच्या दिशेला आणली. आणि कसेबसे सर्वांचे प्राण वाचवले. या भयानक घटनेमुळे आम्ही सगळेच पूर्ण हादरून गेलो आहे.

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

एकतर नविन kia seltos च्या ADAS फीचर्सचा Auto Emergency Breaks हे फीचर आपल्या सुरक्षेसाठी असेल यामुळे अपघात टाळू शकतो अस वाटल, मात्र या घटनेमुळे या फीचर्समुळे किती मोठ्या संकटात सापडू शकतो, किती भयानक किंमत यामुळे मोजावी लागली असती कल्पनाच न केलेली बरी…

दुसरी गोष्ट म्हणजे… तिथून कसा तरी जीव वाचवत माझा भाऊ आणि गाडीतले इतर सगळे थोडेसे पुढे आले. आणि पुढे येऊन त्यांनी 112 नंबरवर संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. त्यावेळी तिथून अजब उत्तर मिळाले. त्यांनी सांगितले की तिथेच थांबा, आम्ही येत आहोत. त्यांचे उत्तर ऐकून आम्हाला हसावे की रडावे तेच कळत नाहीये. तिथेच थांबा म्हणजे त्या दरोडेखोरांकडून जीव गमावून घ्या, मार खावा, तोपर्यंत आम्ही सगळे झाल्यावर येतोच तिथे, असा अजिबात होत नाही बर का🙈

या घटनेनंतर तिथून निघून थेट सोलापूर शहरामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच गाडी उभी केली. स्वतःचा जीव एवढ्या भयानक परिस्थितीतून वाचवून आल्यावर कळत नव्हते नेमके काय करावे. यासाठी थोडा वेळ गाडी बाजूला लावली आणि पाणी पिऊन थांबले. तेवढ्यात एक ट्रॅफिक पोलिस तिथे आले, त्यांना माझ्या भावाने सगळी हकीकत सांगितली. विचारले की तुम्ही कोण यावर कारवाई का करत नाही? त्यांनी उत्तर दिले कि आम्ही तिथेच राहतो. त्यामुळे आमचा जीव धोक्यात येईल आम्ही काही बोलू शकत नाही. तुम्ही बोला, तुम्ही आवाज उठवा🤦‍♀️

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

आपण जर सोलापूर-उमरगा किंवा उमरगा-सोलापूर प्रवास करत असाल तर सावध राहा. या रोडवर भरदिवसा ढवळ्या गाड्या अडवून दरोडेखोर लोकांना लुटत आहेत. तुमचा जीव ही घ्यायला ही लोक पुढे मागे पाहत नाहीत. निव्वळ दैव बलवत्तर म्हणून आमच्या घरचे सुखरूप आहेत…

भयानक घटनेने आम्ही हादरून गेलो आहोत. या हायवेवर प्रवास करणार्‍यांना सावध करावे म्हणुन ही पोस्ट केली आहे. ही घटना फक्त आज घडली असे नाही, या पोस्टनंतर बरेच फोन आणि मेसेज आले आहेत. बर्‍याच जणांना हा अनुभव गेल्या अनेक वर्षापासुन आले आहेत. या रोडवर बर्‍याच जणांचे गाड्या अडवून त्यांना लुटले गेले आहे. आम्ही याची रीतसर तक्रार केली आहे. त्यावर सुरू आहे कारवाई करण्याची त्यांच्या परीने प्रक्रिया… पण आपल्या सर्वांपर्यंत ही घटना पोचवून आपल्याला सावध करावे यासाठी हा लेख प्रपंच…. त्यामुळे विनंती आहे इथून जाता येताना सावध राहा. ही पोस्ट कृपया जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा.

🙏🙏🙏
श्वेता हुल्ले, सोलापूर

For Original Facebook Post, Please Visit –

Source of Information – Shweta Hulle’s Facebook Post

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो “सावधान”…!

सोलापूर-उमरगा रोडवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो "सावधान"...!

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची ‘ब्लू प्रिंट’ तयार करावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

जिल्ह्याच्या औद्योगिक, पर्यटन विकासाची 'ब्लू प्रिंट' तयार करावी - पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील | आपत्ती व्यवस्थापन, शासन आपल्या दारी उपक्रम तसेच जिल्हा विकास, पर्यटन व औद्योगिक विकास आराखड्याचा घेतला आढावा

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डी शहराचं रूप पालटणार ! | शिर्डी सौंदर्यकरणांचा ५२ कोटींचा आराखडा साईचरणी अर्पण ! महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची संकल्पना !

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | श्रध्दा आणि सबुरी | शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर

शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनले आहे. श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या वास्तव्याच्या अनेक खुणा शिर्डीत आहेत. गुरुस्थान द्वारकामाई, लेंडीबाग, चावडी, साईबाबांनी पेटवलेली धुनी ते बसत असलेला दगड, खंडोबा मंदिर तसेच त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू शिर्डीत पहावयास मिळतात.

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | जिथे घरांना दारं नाहीत | शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

नगर जिल्ह्यातील समृध्द वारसा | अमृतातेही पैजा जिंके | श्री ज्ञानेश्वर मंदिर – पैस खांब, नेवासे

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | प्रवरेकाठची देवभूमी – देवगड (DATTAMANDIR DEVGAD)

अहमदनगर औरंगाबाद रस्त्यावर अहमदनगरपासून सुमारे ६६ कि. मी. वर श्रीक्षेत्र देवगड आहे. हे पवित्र क्षेत्र म्हणजे भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल. सदर मंदीर हे अत्यंत सर्वांगसुंदर व पवित्र क्षेत्र नेवासेपासून जवळच आहे. सदर देवस्थान किसनगिरीजी महाराज यांनी स्थापन केलेले आहे. देवगड या क्षेत्राचा विकास भास्करगिरी महाराजांनी केला.

देव आहे पण देऊळ नाही, घर आहे पण दारे नाहीत, झाड आहे पण सावली नाही... ही आगळी-वेगळी वैशिष्ट्ये असलेले शनींचे जागृत देवस्थान शनिशिंगणापूर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. उघड्या चौथऱ्यावर पाच फूट नऊ इंच उंचीची दगडी शिळा असून तेथे अखंड तेलाचा अभिषेक केला जातो.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | महाराष्ट्राचे वैभव-कळसुबाई (KALSUBAI)

महाराष्ट्राचे एव्हरेस्ट समजले जाणारे सह्याद्रीच्या रांगेतील राज्यातील सर्वांत उंच असलेले कळसुबाईचे शिखर (उंची १६४६ मीटर) नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. या शिखरावर महाराष्ट्राची कुलस्वामिनी कळसुबाईंचे छोटे मंदिर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी बारी गावाकडून पायवाट आहे. मंदिरातील मूर्ती गोलाकार, गंडकी शिळेची आहे. घटस्थापनेच्या वेळी नवरात्रामध्ये पाचव्या आणि सातव्या माळेला कळसुबाई शिखरावर ती खूप गर्दी असते म्हणून या माळेला ‘पाहुण्यांची माळ’ म्हणून ओळखले जाते.