महाराष्ट्र शासन योजना

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

सातारा दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून प्रशिक्षणाचा कालावधी चार महिन्यांचा आहे. हे प्रशिक्षण अनिवासी स्वरुपाचे आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह रु.6000/- इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणादरम्यान पुस्तके, गणवेश देखील देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. इच्छुक उमेदवाराने महाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेत स्थळावरील नोटीस बोर्डमधील पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण या टॅबवर जाऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याचा अंतीम दिनांक 25जानेवारी 2023 असा आहे. तरी जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महाज्योती नागपूर मार्फत पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण

महात्मा ज्योतीबा फूले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी पोलीस-मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण नागपूर व औरंगाबाद या दोन ठिकाणी देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली

28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद ।

28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद ।

हाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन । एल्डरलाईन 14567

गेल्या काही दशकांमध्ये भारतातील वृध्दांच्या संख्येमध्ये वेगाने वाढ नोंदवली गेली आहे सध्या देशामध्ये सुमारे 23 कोटी लोकसंख्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाची आहे. ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वेगाने वाढत आहे, त्या प्रमाणात ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठांच्या अडचणींमध्ये वाढ होत आहे.

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

जिल्हा विधी सेवा प्राधिकणाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विधी साक्षरता शिबिर संपन्न

येरवडा येथे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण आणि बांधकाम मजुरांच्या अडचणींवर काम करणाऱ्या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांच्या सार्वजनिक अंकेक्षणबाबत विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले.

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत 24 जानेवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेहाळाव्याचे 24 जानेवारी 2023 रोजी आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी दिली आहे.

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये - महाज्योतीचे आवाहन

टॅब वाटपाबाबतच्या अपप्रचाराला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये – महाज्योतीचे आवाहन

महाज्योतीने संबंधित जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्तांमार्फत टॅब वाटपाचे नियोजन पूर्ण केलेले असून नोंदणीकृत प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब मिळेल याची दक्षता घेतलेली आहे. त्यामुळे टॅब वाटपाबाबत पसरविल्या जाणाऱ्या अपप्रचाराला विद्यार्थी व पालक यांनी बळी पडू नये, असे आवाहन महाज्योती मार्फत करण्यात आले आहे.

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.