महाराष्ट्र शासन योजना

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शिर्डी, (आजचा साक्षीदार), दि. 09 जानेवारी २०२३ – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगरपालिका हद्दीत १५ जानेवारी २०२३ पर्यंत मतदान यादी शुद्धीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहीमेसाठी मतदार केंद्रीयस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहून कामकाज करावे. असे आवाहन शिर्डी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी गोविंद शिंदे यांनी आज येथे केले‌.

शिर्डी नगरपालिका हद्दीतील मतदान केंद्रस्तर अधिकाऱ्यांची (बीएलओ) बैठक नगरपालिका सभागृहात श्री.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते‌. राहाता तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, नायब तहसीलदार विकास गंबरे व सुधाकर ओहोळ यावेळी उपस्थित होते. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)

श्री.शिंदे म्हणाले, आता दर तीन महिन्यांनी मतदार याद्यांचे प्रकाशन होणार असल्याने ‘बीएलओ’ यांनी दक्ष राहून कामकाज करावे. आगामी काळात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने याद्या बिनचूक असणे आवश्यक आहे. यासाठी बीएलओं सोबत नगरपालिका कर्मचारी यांची यादी भागनिहाय नियुक्ती करून विशेष मोहीम स्वरूपात मतदार यादी पडताळणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात यावी. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही या मोहीमेसाठी बीएलओंना सहकार्य करावे. यासाठी बीएलओंसोबत आपला एक प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात यावी.‌ विशेष मोहिमेनंतर यादी बाबत हरकती ऐकून घेण्यात येणार नाहीत. असे आवाहनही प्रांताधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.

मतदार यादीबाबत प्राप्त तक्रारी, आधार व मतदार ओळखपत्र संलग्नीकरण कामाचा यावेळी आढावा घेण्यात आला. शिर्डी हद्दीतील काही मतदार स्थलांतरित झाले असून त्यांची नावे पडताळणी करणे, दुबार नावे तपासणी, मयत नावे वगळणे या कामांचा आढावा घेण्यात आला. युवा मतदार , नवीन नाव नोंदणी, नाव अथवा इतर तपशील बदल याबाबत दुरुस्ती करावी अशा सूचना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बीएलओंना‌ यावेळी दिल्या. (महाराष्ट्र शासन योजना । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन उपक्रम)

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

शिर्डीत १५ जानेवारीपर्यंत मतदार यादी शुध्दीकरण मोहीम । मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी दक्ष राहण्याच्या प्रांतधिकाऱ्यांच्या सूचना

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

ग्रामीण भागात शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 13 जानेवारी या कालावधीत । ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 12 ते 13 जानेवारी या कालावधीत । ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

ई-चावडी प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा – विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

ई-चावडी (E-Chawadi) प्रणाली शिबीरांचे शुभारंभ: पारदर्शक व गतिमानतेसह नागरिकांना मिळणार घरबसल्या सुविधा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

शुभ मंगल सामुहिक विवाह योजनेचा लाभ घेण्यासाठी । 31 जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन…

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

मराठी भाषिक युवकांना विविध क्षेत्रासाठी सहकार्य - पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील