महाराष्ट्र शासन योजना

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

जागतिक तंबाखू विरोधीदिनानिमित्त 31 मेपर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कार्यक्रतर्गत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती केली जात आहे. त्या अनुषंगाने हा विशेष लेख…

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई – वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

तंबाखू सेवनामुळे कर्करोगाचा धोका – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तब्बल 80 टक्के मुख कर्करोग हा केवळ तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन केल्याने मौखिक कर्करोग होतो. या कर्करोगाचे वेळीच निदान झाले तर त्यावर उपचार करून कर्करोगापासून सुटका होवू शकते. यासाठी मौखिक आरोग्य तपासणी मोहीम जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, प्रा. आ. केंद्र येथे होणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख यांनी सांगितले.

तोंड उघडत नसेल, तर घ्या डॉक्टरांचा सल्ला – तंबाखूजन्य पदार्थच्या सेवणामुळे मौखिक कर्करोग होतो. तोंड उघडण्यास त्रास होणे, तोंडात पांढरा किंवा लाल चट्टा, तोंडात गाठ होणे, 15 दिवसा पेक्षा जास्त तोंडात जखम होऊन ती लवकर न भरणे यासारखी लक्षणे दिसताच घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे व्यक्त करतात.

सिगारेट, तंबाखूबाबत नियम काय? तंबाखू विरोधी कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करण्यास सक्त मनाई आहे. तसेच 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये. शैक्षणिक संस्थेच्या 100 यार्डच्या हद्दीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस सक्त मनाई आहे. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या वेष्टनावर 85 टक्के भागात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा वैधनिक इशारा छापणे बंधनकारक आहे. खुली सिगारेट विकण्यास सक्त मनाई आहे.

– जिल्हा माहिती कार्यालय, लातूर

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे, 2023 ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

केंद्रीय दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या नुसार माहिती दळणवळण तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रेल भाषेचा प्रचार, सुगम्य वातावरणाची निर्मिती करण्यावर भर देण्याच्या महत्वपूर्ण सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी निवासी आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक - दोन कार्यालय सुरू

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक – दोन कार्यालय सुरू

कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या “स्पार्क” कार्यक्रमाची सुरुवात

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विशेष विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंटरनँशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्पार्क हा पथदर्शी कार्यक्रम जिल्हात राबविण्यात येत आहे." स्पार्क " हा आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.(लाईट फॉर दि वर्ल्ड), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व प्रोकासूट यांच्यासह एक संयुक्त पद्धतीने स्पार्क (SPARK) कार्यक्रम जगातील बुरकिना फासो,भारत, मोझांबिक आणि मालदिव या चार देशात राबविण्यात येत आहे. देशात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २ कोटी ६८ लक्ष व्यक्ती दिव्यांग आहेत,जे एकूण

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.