सरकारी योजना

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली, दि. 21 जानेवारी २३ (आजचा साक्षीदार): न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

येथील विज्ञान भवन येथे ‘लवचिकता आणि सातत्य – शिखर संमेलन : दृष्टी 2047’ (रिसायलन्स अँड सस्टेनेबल समिट : व्हिजन 2047) या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्यावतीने या शिखर संमेलनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संयुक्त राष्ट्राचे निवासी समन्वयक डॉ. शोंबी शार्प, यांच्यासह विविध वरिष्ठअधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

श्री मुनगंटीवार यांनी सांगितले ते वनमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम करीत असतांना राज्याच्या महसुलात 11 हजार 975 कोटीं रूपयांची विक्रमी वाढ केली.याच काळात महाराष्ट्राने तब्बल 50 कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम केला. ज्याची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. सद्य:स्थितीत राज्यात 6.1 दशलक्ष ‘ग्रीन आर्मी’ कार्यरत आहे. देशाच्या सैन्यदलापेक्षाही ही संख्या मोठी असल्याचा अभिमान वाटतो, असे ते याप्रसंगी म्हणाले. वनमंत्री म्हणून पर्यावरण संवर्धनावर भर देण्याचा प्रयत्न केला असून त्यात ब-याच अंशी यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।
महाराष्ट्र शासकीय उपक्रम । सरकारी योजना । महाराष्ट्र शासन योजना ।

मुनगंटीवार पुढे म्हणाले, पर्यावरणीय बदलांमुळे पूर्वीसारखा पाऊस आता पडत नाही. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. दरवर्षी या हानीमुळे राज्य सरकारला सरासरी 10 हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागते. पर्यावरण संतुलन राखने गरजेचे सांगुन,त्यामुळे पर्यावरणीय बदल थोपविता येतील. हे लक्षात आल्यामुळे वनसंपदा वाढवून पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतल्याशिवाय हे कार्य व्यापक जनचळवळी स्वरूप येणार नाही, त्यामुळे स्वत: पुढाकार घेत संपूर्ण महाराष्ट्रात पर्यावरण संवर्धनाची जनचळवळ उभारण्यासाठी प्रामाणिक योगदान देण्याचे काम केले. त्याचा सकारात्मक परिणामही दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

वनमंत्री असताना सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेला व्यापक यश मिळाले. पूर्वी वनक्षेत्राच्या बफर झोनमध्ये गावे तयार नसायची. या उलट आता ग्रामस्थांची निवेदन येतात, त्यांच्या गावाला या योजनेचा लाभ मिळावा. ही परिवर्तनाची सुरुवात आहे. अशा कार्यातून आणखी मोठा टप्पा गाठायचा असल्याचे श्री मुनगंटीवार याप्रसंगी म्हणाले.

मानव वन्यजीव संघर्षावरील उपायांबाबत सांगताना मुनगंटीवार म्हणाले, जगातील सर्वाधिक 203 वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. पूर्वीच्या तुलनेत वाघांची संख्या वाढतच आहे. त्यांची प्रजनन क्षमतेत वाढ दिसून येत आहे. त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वनक्षेत्रालगतच्या गावातील ग्रामस्थांना जंगलात जाण्यापासून रोखण्याचे मोठे आव्हान आहे. यासाठी रोजगारांची निर्मिती करण्यात येत आहे, ज्यामुळे ग्रामस्थांना उपजीविकेसाठी जंगलात जाण्याची गरजच पडणार नाही, असे ही श्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

जलसाक्षरतेचा उपक्रम महाराष्ट्रात व्यापक प्रमाणावर सुरू आहे. जल, जमीन आणि जंगल यांचा ऱ्हास थांबविण्यासाठी वनमंत्री म्हणून आपण फक्त आपले कर्तव्य निभावत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यासाठी लोकसहभाग गरजेचा आहे. महाराष्ट्राने घेतलेला या सकारात्मक पुढाकाराचा कित्ता भविष्यात सगळेच गिरवतील, असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

व्हिजन 2047: शिखर संमेलन। पर्यावरण संवर्धन अभियानाला जनचळवळीचे स्वरूप यावे :वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

न‍िसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण आणि जल संवर्धन काळाची गरज असून याला जनचळवळीचे स्वरूप यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेली वाहने सोडवून घेण्याचे आवाहन

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाने वाहन कर न भरलेल्या व विविध मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यातंर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय, आळंदी रोड कार्यालय, वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात अटकावून ठेवलेली वाहने वाहन मालकांनी मोटार वाहन कर व दंड भरुन सोडवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजना । शेतकऱ्यांनी वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

ख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्याला 220 शेततळ्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून शेतक-यांना शेततळ्यासाठी कमाल 75 हजार रुपयाच्या मर्यादेत शेततळ्यासाठी अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक शेतक-यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यात 500 आपदा मित्र प्रशिक्षित होणार

जिल्ह्यात हमीदा एज्युकेशन सोसायटीज डॉन ॲकॅडमी (सिडनी पॉईंटरोड) पाचगणी ता.महाबळेश्वर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आपदा मित्र योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकूण 500 आपदा मित्र स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापन या विषयाबाबत 12 दिवसांचे निवासी प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 5 आपदा मित्र स्वयंसेवकांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात मोफत आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यात आले. शासनामार्फत या आपदा मित्रांचा सुरक्षा विमा उतरविला जाणार आहे. हे प्रशिक्षण सातारा जिल्ह्यातील दुर्घटना, संभाव्य धोके टाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण । रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी, व्यापारी, नोकरदारांसाठी गतीमान प्रवासाची सोय होणार असून परिसरातील अर्थविकासाला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला.

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे - जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणीव आणि लोकसहभागातुन नद्यांचे पुनरुज्जीवन करावे – जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

सामाजिक जाणिवेचे भान ठेऊन लोकसहभागातून अकोल्यातील मोरणा व संभाजीनगर च्या खाम नदीचे पुनरुज्जीवन केल्याबद्दल जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंह यांनी जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय व त्यांच्या सहकार्याच्या कामाचे कौतुक करत या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांनी घ्यावा, असे गौरवोद्गार काढले.

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

समुदाय आरोग्य अधिकारीपदासाठी रविवार दि.२२ रोजी प्रवेश परीक्षा

अकोला परिमंडळासाठी समुदाय आरोग्य अधिकारी या पदासाठी होणारी प्रवेश परीक्षा ही रविवार दि.२२ रोजी अकोला येथे होणार आहे. संबंधित उमेदवारांचे प्रवेश पत्र हे शासनाच्या आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत, असे अकोला मंडळ उपसंचालक आरोग्य डॉ. तरंगतुषार वारे यांनी कळविले आहे.

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

फेब्रुवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

जिल्ह्यासाठी माहे फेब्रुवारी महिन्यासाठी लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे. वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम - 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

रब्बी हंगामाची ई-पीक पाहणी अँपद्वारे पीक पेरा नोंदवण्यासाठी तीन दिवसीय विशेष मोहिम – 20 ते 22 जानेवारी 2023 या कालावधीत मोहिम

शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, पीक नोंदणी प्रक्रीयेत शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग वाढवा, कृषी पतपुरवठा धोरण सुलभ व्हावे, पीक विमा आणि पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ करणे, किमान आधारभूत किंमत योजनेतंर्गत विक्रीसाठी संगती देण्याची सुविधा उपलब्ध करुन देणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या उद्देशाने राज्य शासनाने ई-पीक पाहणी उपक्रम सुरु केला आहे.

सेवा प्रणालींमधील सुधारणा सुचनांचा प्रस्ताव पाठवा विभागीय सेवा हक्क आयुक्तांचे निर्देश

सेवा प्रणालींमधील सुधारणा सुचनांचा प्रस्ताव पाठवा विभागीय सेवा हक्क आयुक्तांचे निर्देश

नागरिकांना शासनाच्या विविध सेवा सुविधांचा लाभ देतांना त्या ऑनलाईन व अधिकाधिक पारदर्शक पद्धतीने दिल्या जाव्यात तसेच सध्या देत असलेल्या सेवा प्रणालींमध्ये करावयाच्या सुधारणा सुचनांचा प्रस्तावही पाठवावा असे निर्देश महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे अमरावती विभागाचे आयुक्त रामबाबू यांनी आज येथे दिले.