सरकारी योजना

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

वर्धा दि. १५ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाङमय निर्मितीसाठी वर्ष 2022 करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रवेशिका दिनांक 31 जानेवारी पर्यंत स्विकारण्यात येतील.

दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, प्रभादेवी, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in व साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर देखिल प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध आहेत.

प्रवेशिका पूर्णत: भरून आवश्यक साहित्यासह जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे दिनांक 31 जानेवारी पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावे,असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे. लेखक/ प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना बंद पाकीटावर ‘स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका’ असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर प्राप्त प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत.

जिल्ह्यातील लेखक व प्रकाशकांना या योजनेतंर्गत प्रवेशिका सादर करणे सुलभ व्हावे यासाठी स्पर्धेसाठीची माहिती पुस्तिका व प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत उपलब्ध आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

कोल्हापूर बेंगळूरु विमानसेवा सुरु । कोल्हापूर देशातील प्रत्येक शहराला जोडणार - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा - डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा – डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

आई ही आईच असते. ती श्रीमंत असो किंवा गरीब…आई ती आईच असते…आणि प्रत्येक आईला असेच वाटते की माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावं आणि माझा नऊ महिन्यांचा गरोदरपणा आनंददायी व्हावा. यासाठी प्रत्येक मातेने गरोदरपणात योगा आणि प्राणायाम करण्याचे आवाहन डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख यांनी केले.

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी - श्री. शंभूराज देसाई

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी – श्री. शंभूराज देसाई

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 17 कोटी 29 लाख रुपये निधी खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्सियल पब्लीक सकुलमध्ये प्रवेशासाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील.

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालय आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा व खुल्या गटासाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.

वसतिगृह सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांना संपर्क साधण्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचे आवाहन

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.

गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी

गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी

पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी आता प्रत्येक गावातील पाच महिला एफटीके किटद्वारे गावातच करणार आहेत. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांना या करीता प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी मोहाडी आणि तुमसर पंचायत समितीस्तरावर महिलांना एफटीके (Ftk kit) द्वारे पाणी तपासणी प्रात्यक्षिकाचे धडे देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी यांचे हस्ते एफटीके किटचे वितरण करण्यात आले.

पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

पशुसंवर्धन विभागाच्या सन 2022-23 या वित्तीय वर्षात नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 13 डिसेंबर, 2022 ते 11 जानेवारी, 2023 या कालावधीत https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपवर अर्ज स्वीकारण्यात आले होते.