सरकारी योजना

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

कोल्हापूर, दि. १४ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत “लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजना” राबविण्यात येत आहे. यामध्ये किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले आहे.

भाजीपाला पिकावरील अमर्याद किटकनाशकांच्या वापरापासून शेतकऱ्यांना सावध करून परावृत्त करणे व मानवी आरोग्यास सुरक्षित असणाऱ्या पर्यायी कीड नियंत्रण पध्दतीचा, भाजीपाल्याचा शेतकऱ्यांनी अंगीकार करावा, यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

https://sakshidar.co.in/category/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

योजनेतंर्गत टोमॅटो, वांगी, कोबी व फुलकोबी या चार भाजीपाला पिकांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात येत आहे. या पिकांवरील प्रमुख कीड विचारात घेवून त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी लिंग प्रलोभन सापळे, चिकट सापळे, परभक्षी किडी, जैविक किटकनाशके इत्यादींचा समावेश असणारे प्रात्यक्षिक संच रामेती, कोल्हापूर व कृषि शास्त्रज्ञांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली तयार केले असून त्याचा वापर करुन किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला प्रात्याक्षिके आयोजित करण्यात येत आहेत. योजनेंतर्गत चालू वर्षी जिल्ह्यात टोमॅटो – ३६० एकर, वांगी – ३५० एकर व कोबी फुलकोबी -४०० एकर क्षेत्रावर प्रात्याक्षिके घेण्यात येत असून लाभार्थी निवड चालू आहे.

योजनेतंर्गत प्रति लाभार्थी किमान ०.१० हेक्टर व कमाल ०.४० हेक्टर क्षेत्रासाठी लाभ देण्यात येईल. सहभागी शेतकऱ्यांनी, निश्चित केलेल्या प्रात्यक्षिक संचातील साहित्य स्वतः खरेदी करुन त्याचा वापर करावयाचा असून त्यासाठी प्रति एकर प्रात्याक्षिकासाठी खर्चाच्या ५० टक्के कमाल टोमॅटो 5 हजार रु., वांगी 4 हजार रु. व कोबी, फुलकोबी 4 हजार रु. याप्रमाणे अनुदान रक्कम थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने लाभार्थाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल, असेही कळविले आहे

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत "लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजना" राबविण्यात येत आहे. यामध्ये किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक । कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे - जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक । कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे – जिल्हाधिकारी

जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व बँकांच्या विभागिय व्यवस्थापकांनी शिक्षण, घर, लघु उद्योग आणि शासनाच्या सर्व योजनांसाठी कर्ज लक्षांक वाढवावा. तसेच कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेली १५ ते ४५ दिवसाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.

'मधाचे गाव' - 'मधुमित्र' उपक्रम संपुर्ण राज्यात राबविणार - महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे

‘मधाचे गाव’ – ‘मधुमित्र’ उपक्रम संपुर्ण राज्यात राबविणार – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे

देशातील पहिले मधाचे गाव- 'मांघर' या गावास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गावात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. याप्रसंगी बोलताना सभापती श्री. साठे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचा 'मधाचे गाव', 'मधुमित्र' हे अभिनव उपक्रम संपुर्ण देशात मार्गदर्शक ठरणारे उपक्रम असून राज्यातील प्रत्येक जिल्हयात हे उपक्रम राबविणार आहे.

समाज कल्याण विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती योजना । अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचेअर्ज मंजुरीबाबत महाविद्यालयांनी 20 जानेवारीपूर्वी कार्यवाही करावी

समाज कल्याण विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती योजना । अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत महाविद्यालयांनी 20 जानेवारीपूर्वी कार्यवाही करावी

शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनाबाबत जिल्ह्यातील एकुण 15 महाविद्यालयांकडे सातत्याने पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येत नाही. तरी ज्या महाविद्यालयांकडे जास्तीत जास्त अर्ज प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत शुक्रवार दि. 20 जानेवारी 2023 पुर्वीच कार्यवाही करावी, असे निर्देश समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी दिले आहेत.

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडूंनी १६ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना – सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर - मुख्य निवडणूक अधिकारी

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर – मुख्य निवडणूक अधिकारी

पत्रकार व सामाजिक संस्थांनसाठी निवडणूक वार्तांकन पुरस्कार जाहीर भंडारा दि. ११ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) – लोकशाहीचा ढाचा अबाधित राखण्यासाठी निवडणूक, मतदान, मतदार नोंदणी ...

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा - जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा – जिल्हा परिषद कृषि विभाग

शेतकऱ्यांनी गरजेनुसार युरिया खताचा वापर करावा - जिल्हा परिषद कृषि विभाग