सरकारी योजना

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

लातूर, १५ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींचा त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या अनुदान योजना, बीजभांडवल योजना

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विशेष घटक व बीज भांडवल योजनेतंर्गतचे अनुदान योजना व बीज भांडवल योजनेचे यापुर्वीचे जुने कर्जप्रस्ताव रद्द, बाद करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात, टंकलिखीत अथवा महामंडळाच्या विहीत नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्विकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती जिल्हा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे.

महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्जप्रस्ताव अपात्र, रद्द करण्यात येईल. अर्जदार यांनी आवश्यक कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीश: अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्जप्रस्ताव मध्यस्थामार्फत स्विकारले जाणार नाही. अर्जदारांकडून सर्व परिपूर्ण कागदपत्रे असले ले कर्ज प्रस्तावच स्विकारले जातील. अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक असून अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरुन त्याच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात आढथळा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. कर्जप्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेवून नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस , महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टांस दोन पट या पध्दतीने कर्जप्रस्तावांची ज्येष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येईल.

कर्ज प्रस्तावासोबत दाखल करावयाची कागदपत्रे

जातीचा दाखला, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड झेरॉक्स किंवा रहिवासी दाखला, कोटेशन (जीएसटीसह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड अहवाल, वाहनाकरिता लायसन्स किंवा परतावा किंवा बॅच बिल्ला, जागेचा पुरावा लाईट बिल किंवा टॅक्स पावती आणि व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र.

केंद्र शासनाची एन.एस.एफ.डी.सी. योजना –

ज्या लाभार्थींनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअतंर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे व जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत, अशा लाभार्थींची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करावा.

तसेच लाभार्थ्यांनी उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू त्याच जागेचा प्रमाणित केलेले छायाचित्र, चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत. दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल, असे कार्यालयाचे हमीपत्र, जर लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा पाच ते सहा वर्षे बाकी आहे, असा जामीनदार घेणे आवश्यक आहे.

जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारस, लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र इ. लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांक जी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक सादर करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींचा त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान 8 मे, 2023 रोजी पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर राधाकांत, डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र बोगा, डेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दास, चीफ मॅनेजर समीर देशपांडे हे उपस्थित होते.

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत बुधवारी (दि. 10) जिल्हा परीषद कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी नऊ व्यक्तींकडून एक हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत 2023-24 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे, 2023 ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

केंद्रीय दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या नुसार माहिती दळणवळण तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रेल भाषेचा प्रचार, सुगम्य वातावरणाची निर्मिती करण्यावर भर देण्याच्या महत्वपूर्ण सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी निवासी आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक - दोन कार्यालय सुरू

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक – दोन कार्यालय सुरू

कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.