सरकारी योजना

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा /महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

भंडारा, दि. २७(आजचा साक्षीदार) : : विदयार्थी शिकत असलेल्या शाळा-महाविदयालयातच त्यांना आवश्यक ते दाखले मिळण्यासाठी केलेल्या उपक्रमाची आज जिल्हाभरात अमंलबजावणी झाली असुन आज एकुण 3459 दाखले वाटप करण्यात आले आहेत.

शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्याना शैक्षणीक संस्थेतील प्रवेशासह अनेक कारणासाठी जात प्रमाणपत्र, अधिवासी (डोमिसाईल), नॉन-क्रिमीलेयर, उत्पनाचे प्रमाणपत्र यासह अन्य दाखले गरजेचे असतात. हे लक्षात घेता इयत्ता 8 वी ते 10वीच्या विदयार्थ्याना ते शिकत असलेल्या शाळा महाविदयालयामध्येच हे दाखले उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.त्यानुसार तालुकास्तरीय समीती गठीत करण्यात आली. त्यानुसार आज प्रजासत्ताक दिनी एकुण 3459 दाखले वाटप करण्यात आले.

यामध्ये 785 जात प्रमाणपत्र, 2415 डोमीसाईल, 156 नॉन-क्रिमीलेयर तर 103 उत्पन्नाचे दाखले वाटण्यात आले. जिल्हयातील सात तालुक्यातील 381 शाळा-महाविदयालयात इयत्ता आठवी ते बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याची प्रक्रीया आजपासून सुरू झाली. शैक्षणिक सत्रापूर्वीच कृती आराखडा तयार करून त्याव्दारे विदयार्थ्याना जानेवारी महीन्यापासूनच हे दाखले उपलब्ध करून दिल्याने पुढील शैक्षणिक सोयी-सुविधेकरीता अडचण निर्माण होणार नाही. हे लक्षात घेवूनच डिसेंबर महीन्यात यादृष्ट्रीने जिल्हा प्रशासनाने कृती आराखडा राबविला. त्यामध्ये विभाग प्रमुखांना जबाबदारी सोपविण्यात आली.

त्यानुसार तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी इयत्ता आठवी ते बारावीच्या मुख्याध्यापकांच्या सभा डिसेंबर महिन्याच्या 12 तारखेपासून घेतल्या. मुख्याध्यापकांनी 25 डिसेंबरपासून जात प्रमाणपत्र व इतर दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा केली. तसेच तहसीलदारांनी नेमून दिलेल्या सुविधा केंद्र चालकांनी शाळेत जाऊन उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे महाऑनलाईन संकेतस्थळावर परिपूर्ण अर्ज पाच जानेवारीपर्यंत सादर केले. त्यानंतर 25 जानेवारीपर्यंत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनी महाऑनलाईन प्रणालीवर कार्यवाही केली व पूर्ण प्रक्रियेनंतर तालुकास्तरीय समिती सदस्य व इतर शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत 26 जानेवारी रोजी पहील्या टप्प्यात 3459 दाखले वाटप करण्यात आले.

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा – जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

कुष्ठरोगाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने उपचार घ्यावा - जिल्हाधिकारी • 30जानेवारी पासून जिल्हयात स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान

जिल्ह्यातील सर्व शेती खातेदारांना घरपोच सातबारा वितरण मोहिमेअंतर्गत 100 टक्के सातबाराचे वाटप - पालकमंत्री दीपक केसरकर

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

पदवीधर निवडणूकीच्या विविध परवानग्यांसाठी तहसील कार्यालयांमध्ये एक खिडकी सुविधा कक्ष जिल्हाधिकारी यांचे आदेश

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

विधानपरिषद निवडणुकीत जांभळया रंगाचाच स्केच पेन मतदारांनी वापरावा – निवडणूक विभाग

महाराष्ट्र-शासन-उपक्रम-महाराष्ट्र-शासन-योजना-सरकारी-योजना (2)

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे – कृषि सहसंचालकांचे आवाहन

उन्हाळी हंगाम २०२२-२३ मध्ये शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे - कृषि सहसंचालकांचे आवाहन

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देऊया!

'महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती' या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आपणास मिळाली आहे.

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची
इसापूर रमना येथे जनजागृती

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत बालविवाह प्रतिबंध कायद्याची इसापूर रमना येथे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

हिंदू परंपरेनुसार, नदीत स्नान केल्याने अनेक आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे होतात असे मानले जाते. यापैकी काही फायद्यांचा समावेश आहे.!

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

किडनी वाचवा आणि डायलिसिस थांबवा अभियानांतर्गत आयोजित निबंध स्पर्धेचे 26 जानेवारी रोजी बक्षीस वितरण

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा

साखर उद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्राचे सहकार्यमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा नवी दिल्ली, दि. 26 (आजचा साक्षीदार) : ...