श्रीरामपूर मध्ये व्हेंटिलेटर द्या… आमदार लहू कानडे : ग्रामीण रुग्णालयात ही सुविधा उपलब्द करून देण्याची मागणी
Shrirampur 24Tass : कोरोनाच्या गंभीर रुग्णांना नगर ऐवजी श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयातच उपचार मिळावे, यासाठी आमदार लहू कानडे यांनी पुढाकार घेतला आहे. आमदार निधीतून ग्रामीण रुग्णालयात आयसीयू सुविधा व व्हेंटिलेटर सुविधा प्रदान करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
श्रीरामपूर शहर व तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यांच्याकरिता संत लूक हॉस्पिटल व शिरसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल येथे उपचार केले जात आहेत. परंतु कोरोना रुग्ण गंभीर झाल्यास त्याला व्हेंटिलेटरची गरज भासते. त्यासाठी रुग्णांना पर्यायी नगर येथे हलवावे लागते. त्याकरिता वेळ खर्ची होतो व रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते. त्यामुळे श्रीरामपूर शहरात त्याला उपचार मिळावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार लहू कानडे यांनी म्हटले आहे.
Shrirampur 24Tass : ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. वसंत जमधडे यांनी यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. गंभीर रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधांची यादी करावी यासाठी आमदार निधीतून सर्व मदत केली जाईल, अशी माहिती आमदार लहू कानडे यांनी दिली तसेच जिल्हा रुग्णालयाकडे तशी मागणी नोंदवावी व लेखी प्रस्ताव पाठवावा, असेहि त्यांनी म्हटले आहे.
याविषयी भाष्य करताना आमदार लहू कानडे म्हणाले कि, श्रीरामपूर शहरात अनुभवी श्वसनरोगतज्ज्ञ आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णांवर उपचार करता येतील. जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा आवश्यक पुरवठा झालेला आहे. त्यातून काही व्हेंटिलेटर मिळविता येतील, यासंबंधी प्रांताधिकारी अनिल पवार यांनाही कळविण्यात आले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांनी प्रस्ताव आपल्या वरिष्ठांकडे पाठवावा त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासनही आमदार कानडे यांनी दिले आहे.