आज नगर जिल्ह्यात ५४६ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर… रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के…. आजचा साक्षीदार | Sakshidar
नगर जिल्ह्यात आज ५४६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३१ हजार ९३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ९९६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३१३ आणि अँटीजेन चाचणीत १४१ रुग्ण बाधीत आढळले.
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा.!
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १२, अकोले ०१, जामखेड १२, कर्जत ०४, नगर ग्रामीण २७, पारनेर ५२, पाथर्डी ०९, राहता ०१, राहुरी ०१, संगमनेर ०४, श्रीगोंदा ४४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, अकोले १७, जामखेड ०४, कर्जत १४, कोपरगाव २९, नगर ग्रा.१२, नेवासा ३३, पारनेर १२, पाथर्डी ११, राहाता १५, राहुरी १५, संगमनेर ७४, शेवगाव १२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ४३ आणि इतर जिल्हा १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा.!
अँटीजेन चाचणीत आज १४१ जण बाधित आढळुन आले. मनपा ०१, अकोले १९, जामखेड ०६, कर्जत ०६, कोपरगाव ०७, नगर ग्रा. ०३, नेवासा ०२, पारनेर ०३, पाथर्डी ०९, राहाता ०६, राहुरी १२, संगमनेर ३०, शेवगाव १३ आणि श्रीगोंदा २४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या.!
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले ६७, जामखेड १३, कर्जत ३२, कोपरगाव २२, नगर ग्रा. १७, नेवासा २७, पारनेर ४५, पाथर्डी ३२, राहाता २२, राहुरी १८, संगमनेर ११५, शेवगाव ४१, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर २७, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:३,३१,९३१
उपचार सुरू असलेले रूग्ण:४९९६
पोर्टलवरील मृत्यू नोंद:६८१६
एकूण रूग्ण संख्या:३,४३,७४३
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)