आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

आता शिर्डी श्री. साईबाबा दर्शनासाठी १० हजार ऑफलाईन पासेस..

कोरोना निर्बंधामुळे शिर्डी येथील #श्री #साईबाबा दर्शनासाठी दररोज १० हजार ऑफलाईन प्रवेश पासेसचे वितरण करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी घेतला आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ५ ऑक्टोंबर २०२१ शिर्डी येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत अहमदनगर येथील कोरोना वाढती रूग्णसंख्या पाहता धार्मिक स्थळांवर व प्रार्थनास्थळांवर कोरोना नियमावलीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयानुसार ६ ऑक्टोंबर २०२१ पासून श्री.साईबाबा संस्थांमधील सर्व १५ हजार पासेस ऑनलाईन देण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र आता अलीकडच्या काळात अहमदनगरमधील कोरोना रूग्णसंख्या कमी होत असल्यामुळे शिर्डी येथील श्री.साईबाबा संस्थान कडून ऑफलाईन पासेस वितरणाची परवानगी देण्यात यावी. असा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापनास पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावावर आज अहमदनगर येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी निर्णय घेत आता दररोज १० हजार ऑफलाईन पासेस वितरणाला परवानगी दिलेली आहे. मात्र कोविड नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी श्री.साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे कळविला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment