”घरोघरी तिरंगा” उपक्रमात नागरीकांनी स्‍वयं:प्रेरणेने आपल्‍या घरावर तिरंगा फडकवावा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील…

नगर, 12 ऑगस्‍ट 2022 – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्‍त 13 ते 15 ऑगस्‍ट 2022 या कालावधीत संपूर्ण राज्‍यासह जिल्‍ह्यात ”घरोघरी तिरंगा” हा उपक्रम मोठ्या उत्‍साहाने साजरा करण्‍यासाठी जिल्‍ह्यातील नागरीकांनी स्‍वयं:प्रेरणेने तिरंगा ध्‍वज आपल्‍या घरावर फडकवावा यासाठी शहर भाग ते ग्रामीण भागातील सर्व नागरीकांना प्रशासनाच्‍या वतीने सक्‍ती न करता आपल्‍या घरावर तिरंगा लावण्‍यासाठी प्रोत्‍साहित करावे अशा सूचना मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिल्‍यात. मुंबई येथुन दुरदृष्‍य प्रणालीद्वारे प्रशासनातील अधिका-यांशी संवाद साधतांना मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील बोलत होते.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात ”#घरोघरीतिरंगा” उपक्रम पूर्वतयारी आणि नियोजन या संदर्भात दुरदृष्‍य प्रणालीद्वारे बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्‍हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, विविध विभागांचे विभाग प्रमुख तर तालुका स्‍तरावरुन दुरदृष्‍य प्रणालीद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

”घरोघरी तिरंगा” उपक्रमात नागरीकांनी स्‍वयं:प्रेरणेने
आपल्‍या घरावर तिरंगा फडकवावामंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील दुरदृष्‍य प्रणाली द्वारे जिल्‍ह्यातील प्रशासकीय अधिका-यांशी साधला संवाद


मंत्री श्री. विखे पाटील पुढे म्‍हणाले, स्‍वातंत्र्याच्‍या अमृत उपक्रमांतर्गत राबविण्‍यात येणारे ”स्‍वराज्‍य अभियान, घरोघरी तिरंगा” अशा विविध उपक्रमांध्‍ये लोकसहभाग महत्‍वाचा असून सर्व घटकातील लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्‍यासाठी प्रत्‍येक विभागाच्‍या अधिका-यांनी विशेष प्रयत्‍न करावेत. अशा सूचना त्‍यांनी बैठकीत दिल्‍यात. ”घरोघरी तिरंगा” उपक्रमात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचत गट, विविध संस्‍था, उद्योग, सर्व राजकीय पक्ष यांनी सुध्‍दा सहभागी होणे अपेक्षित आहे. हा शासकीय उपक्रम नसुन स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव आहे. हा उपक्रम सर्वांच्‍या सहकार्यानेच यशस्‍वी होईल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.


बैठकीच्‍या सुरूवातीला मंत्री श्री. विखे पाटील यांनी जिल्‍हा प्रशासनाने ”घरोघरी तिरंगा” उपक्रमाच्‍या जिल्‍ह्यात केलेल्‍या उत्‍कृष्‍ट नियोजन व तयारी संदर्भात सर्व शासकीय अधिका-यांचे अभिनंदन केले. जिल्‍हाधिकारी डॉ. भोसले यांनी उपक्रमाच्‍या सर्व नियोजनाबाबत सुरूवातीला माहिती दिली.
बैठकीत महसुल विभाग, महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्‍हा परिषद आदी विभागांचा तसेच तालुका स्‍तरावर सर्व तलसिलदार यांच्‍यामार्फत नागरीकांचा सहभाग वाढविण्‍यासाठी कोणकोणत्‍या उपाययोजना, नियोजन या बाबत दुरदृष्‍य प्रणालीद्वारे आढावा घेतला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment