जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश || MLA Shankarrav Gadakh Join Shivsena
2019 विधानसभा च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेले आमदार शंकरराव गडाख यांनी महाआघाडीला सरकार स्थापन करताना शिवसेनेला पाठिंबा दिला होता. अखेर आज आमदार शंकरराव गडाख यांनी हाती शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवास स्थानी राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या हातात शिवबंधन बांधलं. यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
याबाबत शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ही माहिती देण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankarao जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव @NarvekarMilind_ जी उपस्थित होते. pic.twitter.com/0obIZOPVhF
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) August 11, 2020
2019 च्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे नगर जिल्ह्यातील नेवासा मतदार संघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेल्या गडाख यांनी शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला होता.
माजी दिवंगत आमदार अनिल भैय्या राठोड यांच्या निधना नंतर पोकळी नगर जिल्ह्यातील भरुन काढण्यासाठी शंकरराव गडाख यांचा शिवसेना पक्षप्रवेश नगर मध्ये शिवसेनेला नवसंजिवनी देणारा आहे. आमदार शंकरराव गडाख यांच्या पक्षप्रवेशाने नगरमध्ये शिवसेने ची ताकद वाढणार आहे याकरिता शिवसेनेने शंकरराव गडाख यांच्यावर नगरची जबाबदारी सोपवली आहे.
जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिन : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख Shankarrav Gadakh Join Shivsena
“शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करुन यापुढे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली माझ्या शेतकरी बांधव व गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहिल,” अशी प्रतिक्रिया आमदार शंकरराव गडाख यांनी व्यक्त केली.
शिवसेना पक्ष हा कष्टकरी शेतकरी,गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे त्यामुळे शिवसेना पक्षाच्या विचारधारेशी आमचे विचार जुळत असल्यामुळे व सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या प्रति असलेल्या निष्ठा व विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करून
— Shankarrao Gadakh Patil (@GadakhShankarao) August 11, 2020
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याबाबत …About MLA Shankarrav Gadakh
शंकरराव गडाख हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे पुत्र आहेत.नगर जिल्ह्यातील नेवासा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आमदार शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतिकारक पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि सत्तास्थापने साठी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या ते उस्मानाबादचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे मृदा आणि जलसंधारण मंत्री आहेत.








