जानेवारी ते डिसेंबर शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याच्या सूचना : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक पार पडली. राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सूचना केली
कोरोना समस्या मुळे सध्या सर्वच क्षेत्रांबरोबर शिक्षण क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्या पासून शैक्षणिक वर्ष सुरु होत असते. मात्र सध्याची कोरोना काळ पाहता जानेवारी ते डिसेंबर असे शैक्षणिक वर्ष सुरु करता येते का त्याबाबत केंद्राशी विचारविनिमय करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा निवासस्थानी नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू इत्यादी उपस्थित होते. भविष्यात दहावीच्या विद्यार्थ्यां साठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरु करता येतील का यावरही बैठकीत चर्चा झाली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, या नव्या धोरणात अनेक नव्या संकल्पना आहेत. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील तसेच काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावेच लागतील तर जे स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्यात काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करावा लागेल. या दृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात बैठक पार पडली.
राज्यातील नामवंत शिक्षण तज्ञ, अभ्यासक यांची समिती स्थापण्याची मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सूचना केली.https://t.co/YP6oAQCdjr
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 20, 2020
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिक्षणाला सुरुवात झाली आहे. याबाबत शिक्षण विभाग ऑक्टोबरपर्यंत एकूणच बदललेल्या स्थितीत विद्यार्थी, शिक्षक यांना दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन तसेच ऑफलाईन शिक्षणाच्या फलश्रुतींचा आढावा घेणार आहे. अकरावी प्रवेशाचे काम व्यवस्थित सुरू आहे. व पहिली ते बारावी पर्यंत 25 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे.