Shrirampur 24Tass : नगर जिल्ह्यात आज ३८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता सहा हजारांच्या वर गेली आहे. आजपर्यंत ६२५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६७.३४ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (शनिवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २९३१ इतकी झाली आहे.
६ हजारहून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे होऊन गेले घरी. आज एकूण३८४ रुग्णांना डिस्चार्ज
- मनपा १७२
- संगमनेर २३
- राहाता ३
- पाथर्डी २७
- नगर ग्रा.१६
- श्रीरामपूर १८
- कॅन्टोन्मेंट १३
- नेवासा २१
- श्रीगोंदा १८
- पारनेर १०
- अकोले ४
- शेवगाव १४
- कोपरगाव ३९
- जामखेड ५
- मिलिटरी हॉस्पीटल १
एकूण:६२५०