अहमदनगर मनपा हद्दीमध्ये खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील ४० टक्के बेड्स कोरोना साठी आरक्षीत || Nagar Municiple Corporation Reserve 40 % Beds from Private & Register Hospital for Corona
अहमदनगर मनपा हद्दीमध्ये संभाव्य कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ विचारात घेता खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील ४० टक्के बेड्स आरक्षीत करून त्याठिकाणी कोविड हॉस्पीटल (DCH) कार्यान्वीत करुन रुग्णांवर उपचार करण्याचे नगर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांचे आदेश.
सदरील आदेश पुढीप्रमाणे :
अहमदनगर दि. 13/08/2020
ज्याअर्थी, संदर्भ क्रमांक 4 चे अधिसूचनेनुसार या कार्यालयाकडील संदर्भ क्र.6 चे आदेशान्वये जिल्हयातील कोवीड-19 बाधीत रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयांनी विविध उपचारांसाठी (कोवीड बाधीत व इतर रुग्ण) आकारावयाचे कमाल दर मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. तसेच खाजगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तसेच संदर्भ क्र. 5 अन्वये कोवीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली आहे.
ज्याअर्थी, सदयस्थितीत अहमदनगर जिल्हयामध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असून महानगरपालिका हद्दीमध्ये दैनंदिनरित्या रुग्णांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये विविध सार्वजनिक व खाजगी ccc, DCHC व DCH सुरु करण्यात आले असून त्याठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात येत आहेत. संदर्भ क्र.9 व 10 अन्वये अहमदनगर महानगरपालीका हद्दीमधील विविध खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडे कोव्हीड बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणा-या बेड्स ची माहिती मागविण्यात आलेली होती.
ज्याअर्थी, अहमदनगर महानगरपालिका हद्दीमध्ये संभाव्य कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ विचारात घेता कोरोना बाधीत रुग्णांवर उपचाराच्या सोयीकरीता खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांकडील बेड्स आरक्षीत करुन त्याठिकाणी DCH कार्यान्वीत करुन रुग्णालयाकडील डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, व इतर अधिकारी व कर्मचारी तसेच रुग्णालयातील जीवरक्षक प्रणालीसाठी आवश्यक साधनसामग्रीव्दारे कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, मी जिल्हाधिकारी अहमदनगर मला आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 65 व साथ रोग अधिनियम 1897 अन्वये निर्गमित करण्यात आलेली अधिसूचना व नियमावलीमधील तरतुदीनुसार तसेच संदर्भ क्रमांक 4 अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अहमदनगर महानगरपालीका हद्दीतील खालील प्रमाणे खाजगी व नोंदणीकृत रुग्णालयांना त्यांचेकडील कमीतकमी 40% बेड्स आरक्षीत करुन त्याठिकाणी DCH कार्यान्वीत करणे.
४० %बेड्स आरक्षित केलेल्या हॉस्पिटलस ची यादी पुढीलप्रमाणे
- १ जाधव हॉस्पीटल, चौपाटी कारंजा, अहमदनगर
- २ अंबीका नर्सिंग होम, नगर पुणे रोड, केडगाव, अहमदन
- ३ गॅलक्सी हॉस्पीटल, झोपडी कॉन्टीन जवळ, सावेडी.
- ४ अनभुले हॉस्पीटल, प्रेमदान चौक, सावेडी, अहमदनगर.
- ५ खालकर हॉस्पीटल, सथ्था कॉलनी, अहमदनगर
- ६ बालाजी पिडीयाट्रिक अण्ड डेंटल हॉस्पीटल, घुमरे गल्ली
- ७ प्रणव हॉस्पीटल मल्टीस्पेशालीटी अण्ड आयसीयु सेंटर,
- ८ झावरे पाटील हॉस्पीटल अण्ड नर्सिग होम, रावबहादुर
- ९ पाटील अॅक्सीडेन्ट हॉस्पीटल, कोठीचौक, अहमदनगर.
- १० फाटके पाटील हॉस्पीटल, स्टेशन रोड, अहमदनगर
- ११ अपेक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, सावेडी, अहमदनगर
- १२ श्रीदिप हॉस्पीटल, बडवे पेट्रोल पंपाजवळ, स्टेशन रोड,
- १३ सिध्दी विनायक हॉस्पीटल, सक्कर चौक, अहमदनगर
- १४ क्रिस्टल हॉस्पीटल अण्ड रिसर्च सेंटर, झोपड़ी कॉन्टीन, अहमदनगर :
- १५ सिटी केअर ट्रस्ट हॉस्पीटल, तारकपुर बस स्टॅण्ड समोर, अहमदनगर
- १६ देशपांडे हॉस्पीटल, पटवर्धन चौक, अहमदनगर
- १७ आरोग्यम अग्रवाल हॉस्पीटल, स्वामी समर्थ मंदीर, अहमदनगर