नेवासा तालुक्यातील नेवासा ते चिंचबनरोड (माळीवस्ती) जवळील रस्त्याच्या पुलाच्या १ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या कामाचे आज भुमीपुजन समारंभ करण्यात आला….

नेवासा तालुक्यातील नेवासा ते चिंचबनरोड (माळीवस्ती) जवळील रस्त्याच्या पुलाच्या १ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या कामाचे आज भुमीपुजन समारंभ करण्यात आला….

यावेळी सदर पुलाचे काम चांगल्या प्रतीचे करण्याचे व लवकरात लवकर करण्याबाबत संबंधितास सूचना या भुमीपुजन समारंभ दरम्यान देण्यात आल्या. या पुलामुळे नेवासा,चिंचबन,पुनतगांव व खुपटी गावांबरोबर परीसरातील गावांचा दळणवळणाचा प्रश्न मिटणार आहे. पावसामुळे पुराचे पाणी येऊन पुल कायम पाण्याखाली जात होता.नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलामुळे पावसाळ्यात विद्यार्थी व नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे.

यावेळी भूमिपूजन प्रसंगी ज्ञानेश्र्वर देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार,सदस्य विक्रम चौधरी,सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, नगरसेवक दिनेश व्यवहारे,रणजित सोनवणे,मा.नगरसेवक काकासाहेब गायके,मार्केट कमिटीचे संचालक सुधाकर पवार,चिंचबनचे सरपंच विठ्ठल शिंदे,मा.सरपंच अरुण पाटील शिंदे,पुनतगावचे मा. सरपंच साहेबराव पवार,संभाजी पवार,सरपंच सुदर्शन वाकचौरे,नजिरभाई पटेल,जाकिर शेख,मोजमखान पठाण,नानाभाऊ घोलप,राजेंद्र वरुडे,दत्तात्रय सपकाळ,गणेश दारूंटे,कुंडलिक दारुंटे,संभाजी कार्ले,नितीन मिरपगार,अभिजीत मापरी,विनायक नळकांडे, सुनील साळुंके,माऊली कार्ले,तसेच नेवासा,चिंचबन,पुनतगाव,खुपटी येथिल कार्यकर्ते,तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment