नेवासा तालुक्यातील विविध रस्त्यांना मंजूरी आणून आज त्यांचे भूमिपूजन करण्यात आले…
नेवासा तालुक्यातील रांजणगाव ते शहापूर – घोडेगाव कुकाना रस्त्यापर्यंत डांबरीकरण कामासाठी अडीच कोटी रुपये ,रांजणगाव ते सौंदळा रस्ता डांबरीकरण कामासाठी दोन कोटी रुपये,भानसहिवरे ते रांजणगाव रस्ता डांबरीकरण कामासाठी अडीच कोटी रुपये, रांजणगाव देवी ते पेहेरे वस्ती रस्ता खडीकरण कामासाठी वीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्यांना मंजूरी आणून आज त्यांचे भूमिपूजन करण्यात आले.
या रस्त्यांमुळे कारेगाव,रस्तापुर, भानसहिवरा,रांजणगाव देवी,सौंदाळा,शहापुर,फत्तेपुर या गावांबरोबर परिसरातील अनेक गावांचा दळवळणाचा प्रश्न मिटणार आहे,खराब रस्त्यामुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी आमदार लहु कानडे, मुळा कारखान्याचे चेअरमन नानासाहेब पाटील तुवर, माजी व्हा. चेअरमन भाऊसाहेब पाटील मोटे, पंचायत समितीचे सभापती रावसाहेब पाटील कांगुणे,उपसभापती किशोर जोजार,डाॅ.शिवाजी शिंदे बाजार समिती सभापती,काशिनाथ नवले,शरदराव आरगडे,बाबा आरगडे सरपंच शिवाजी वाकचौरे,उपसरपंच राजेंद्र पेहरे, शरद वाकचौरे,रामभाऊ महाराज पेहरे,बाळासाहेब पेहरे, राजेंद्र तांबे,रामभाऊ चौधरी,कारभारी चौधरी,रवीद्र वाळुंजकर,सोपान चौधरी, शिवाजी पंडित,अशोक रोडगे, भारत वाकचौरे, देविदास वाकचौरे अशोक पंडित,बबन वाकचौरे व आदी मान्यवर यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ, तरुण युवक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.