प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) योजनेचा सहावा हप्ता जमा … लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द… Beneficiaries List Updated 

कोरोनाच्या पार्श्वभुमिवर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि लॉकडाऊनच्या काळात देशातील शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणुन या प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) च्या पैशाचे हंप्ते हे लवकर जमा करण्यात आले आहे. आता या योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर ज्या शेतकऱ्यांना या योजनेतुन लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांची गावनुसार यादि प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) च्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आता बरेच नविन बदल करण्यात आले आहे, आता या संकेतस्थळावर ज्या शेतकऱ्यांची नोदणी या योजनेसाठी अद्याप झालेली नाहि त्या शेतकऱ्यांना स्वत: नोंदणी करता येणार आहे, तसेच लाभार्थ्याची स्थिती पाहणे, आधार कार्डची माहिती भरणे किंवा अपडेट करणे, गावनिहाय लाभार्थ्यांची यादि पाहणे इत्यादि अनेक योजनेशी संबधीत नविन बदल संकेतस्थळावर करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (Pradhanmantri Kisan Sanman Nidhi Yojna) चा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादि तसेच आपण आपला आधार नंबर, मोबाईल नंबर किंवा बँक अकाउंट नंबर टाकून आपले स्वतःची माहिती खालील व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे आपण पाहु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *