महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २० सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा - २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २०  सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended

महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा – २०२० आता १३ सप्टेंबर ऐवजी २०  सप्टेंबरला || MPSC Exam Date Extended 

१३ सप्टेंबरला NEET परीक्षा देशभरात होत असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्यास उपकेंद्रांची उपलब्दता व इतर  प्रशासकीय अडचणी मुळे परीक्षा 20 सप्टेंबरला घेण्यात येणार…

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ने आपल्या प्रसिध्दीपत्रक मध्ये पुढील बाबी सांगितल्या आहेत… 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिनांक २३ डिसेंबर, २०१९ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२०, रविवार, दिनांक ५ एप्रिल, २०२० रोजी घेण्याचे प्रस्तावित होते. तथापि कोरोना (Covid-१९) विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात येऊन दिनांक १७ जून, २०२० रोजीच्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा दिनांक १३ सप्टेंबर, २०२० रोजी घेण्याचे घोषित करण्यात आले होते. 

आयोगा (MPSC) कडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून दिनांक ३ जुलै, २०२० रोजीच्या सुचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET) दिनांक १३ सप्टेंबर, २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले. आयोगामार्फत आयोजित विषयांकित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरीता प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देशपातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत आयोजित विषयांकित राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० ही रविवार, दिनांक २० सप्टेंबर, २०२० रोजी घेण्यात येईल.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तसेच उमेदवार व परीक्षा आयोजनातील सर्व कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी आयोगाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.

सहसचिव,परीक्षा पूर्व महाराष्ट्र लोकसेवा आयोग

प्रसिध्दीपत्रक आपल्या माहितीसाठी :

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment