महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून, महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागामार्फत, नेवासा तालुक्यात चार हजार आठशे नोंदणी कृत कामगारांची नवीन नोंदणी, झालेली असून त्यातील,जेऊर हैबती येथे, आज दोनशे कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात सेप्टी किटचे वाटप तसेच मध्यान्ह भोजन योजनेचा शुभारंभ मा.सभापती सौ.सुनीताताई शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते पार पडला.

त्यावेळी पंचायत समिती सदस्य अजितभाऊ मंडलिक, बाबासाहेब पा.म्हस्के, महेशराजे म्हस्के (सरपंच), सोमनाथ कचरे, दौलतअण्णा देशमुख, सौ.मीनाक्षीताई रिंधे, अरुणकाका मिसाळ, निवृत्ती पा. म्हस्के, शरद शिंदे, संतोष म्हस्के, गणेशभाऊ शेटे, ॲड.अजय रींधे, शंकरअप्पा म्हस्के, अण्णासाहेब म्हस्के, नानासाहेब खराडे सर, कामगार संघटनेचे अध्यक्ष अंबादास गायकवाड, उपाध्यक्ष राजू मिसाळ, दिगंबर वाकचौरे, माणिक व्यवहारे व गावातील नागरिक, बांधकाम कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *