महालक्ष्मी हिवरा येथे बिबट्याचा आठ वर्ष मुलीवर हल्ला…|| Newasa Bibtya News Batmi

महालक्ष्मी हिवरा येथे बिबट्याचा आठ वर्ष मुलीवर हल्ला...|| Newasa Bibtya News Batmi

(संग्रहित छायाचित्र)

महालक्ष्मी हिवरा येथे बिबट्याचा आठ वर्ष मुलीवर हल्ला…|| Newasa Bibtya News 

नेवासा तालुक्यातील महालक्ष्मीहिवरा येथील केदारवस्ती या परीसरात घराच्या अंगणात खेळत असलेल्या आठ वर्षाच्या मुलीवर बिबट्याने झडप घालून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.

सोमवार दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी साडेसात वाजता अदिती गणेश टिकोणे ही मुलगी आपल्या  घरासमोरील अंगणात खेळत असताना उसाच्या शेतातून अचानक आलेल्या बिबट्याने तिच्यावर झडप घालून तिच्या पाठीवर, मानेवर व डोक्याला खोलवर जखमा करून मुलीला जखमी केले. अदिती ची आज्जी रंजना अशोक टिकोणे यांनी धाडस दाखवत बिबट्याच्या जबड्यातून आदितीला सोडविले.घरातील इतरांनी लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या पुन्हा ऊसाच्या शेतात पळून गेला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment