राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायती मधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका…
शिर्डी : निधन, राजीनामा, अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. 21 डिसेंबर 2021 रोजी मतदार घेण्यात येणार आहे. राहाता तालुक्यातील 7 ग्रामपंचायती मधील रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राहाता तालुक्यातील बाभळेश्वर , गोगलगाव हसनापूर, लोहगाव, नांदुर्खी बु, लोणी खु, वाळकी अशा एकूण ७ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत.
21 डिसेंबर रोजी मतदान व 22 डिसेंबर ला निकाल
या निवडणूकांसाठी 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2021 या दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वेळेत राहाता तालुका प्रशासकीय इमारत येथून नामनिर्देशनपत्रे प्राप्त होतील व उमेदवारी अर्ज ही दाखल करता येईल. 7 डिसेंबर 2021 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण करण्यात येणार आहे. 21 डिसेंबर, मंगळवार रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. 22 डिसेंबर 2021 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने (OFF LINE) राबविण्यात येणार आहे. अशी माहिती ही श्री.हिरे यांनी दिली आहे.