राहाता येथील लोक अदालतीत १५०५ प्रकरणे निकाली…साडेपाच कोटीची वसुली…. आजचा साक्षीदार |Sakshidar

राहाता येथील लोक अदालतीत १५०५ प्रकरणे निकाली…साडेपाच कोटीची वसुली…. आजचा साक्षीदार |Sakshidar

आजचा साक्षीदार |Sakshidar : राहाता येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार,दि.२५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात ६७०६ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५०५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून ५ कोटी ५५ लाख ८६ हजार ९०५ रूपयांची वसुली झाली.

दिवाणी व फौजदारी गुन्ह्यातील एकूण १७८९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३०८ प्रकरणे निकाली काढण्यात आली त्या माध्यमातून १ कोटी ८१ लाख ५८ हजार ५४३ रुपयांची वसुली झाली. तसेच सर्व राष्ट्रीय बँका, बी.एस.एन.एल, ग्रामपंचायत, नगरपंचायत व एम.एस.ई.बी यांची दाखलपूर्व ४९१७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ११९७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून ३ कोटी ७४ लाख २८ हजार ३६२ रूपयांची वसूली झाली. या अदालतीत एकूण १५०५ प्रकरणे निकाली होऊन ५ कोटी ५५ लाख ८६ हजार ९०५ रुपयांची वसुली झाली. बँकेच्या कर्जदारांनी बँकांकडून कर्ज रकमेत मिळणाऱ्या भरघोस सवलतींचा फायदा घेतला.तसेच ग्रामपंचायत, एमएसईबी, बीएसएनएल यांनी दिलेल्या सवलतींचा सुद्धा पक्षकारांनी लाभ घेतला आहे.
या लोक अदालतीचे उद्घाटन राहाता न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश आदिती आर. नागोरी यांच्या हस्ते झाले. यावेळी न्यायाधीश श्रीमती डी.ए.डोईफोडे, न्यायाधीश श्रीमती सरिता विश्वंभरन, शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, राहाता वकील संघाचे उपाध्यक्ष जी. व्ही. बोर्डे, बँकेचे विधीज्ञ अॅड. एस. एन. गोरे, अॅड. जे. के. गोंदकर, अड. एस. डी. निघुते, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. गायकवाड आदी उपस्थित होते.

सौजन्य : उप माहिती कार्यलय, शिर्डी


सदर लोक अदालतसाठी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ३ पॅनल तयार करण्यात आले होते. प्रत्येक पॅनलवर २ विधीज्ञांची नेमणूक करण्यात आली होती. अॅड.एस.एन. चित्रे, अॅड. श्री. डी.डी.शिंदे, अॅड. सौ. एस. व्ही. देशमुख, अॅड. सौ. जे. आर. सिसोदिया, अॅड. सौ. एस. एस. म्हस्के, अॅड. एस. पी. गोंदकर या विधीज्ञांनी पॅनल पंच म्हणून काम पाहिले. लोकअदालत यशस्वी होण्यासाठी राहाता बारचे अध्यक्ष अॅड ए.एस. शेजवळ, बार असोसिएशनचें सर्व विधिज्ञ तसेच तहसीलदार कुंदन हिरे यांचे सहकार्य लाभले. राहाता न्यायालयाचे अधीक्षक आर.एम. लोहाटे, सहाय्यक अधीक्षक डी.बी.शिंदे, श्रीमती एस.एस.राव, विधी सेवा समितीचे कर्मचारी यु.ए. बळे व न्यायालयीन कर्मचारी वृंद यांनी लोकअदालत यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

माहिती सौजन्य : उप माहिती कार्यलय, शिर्डी

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment