श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates News

श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates


श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण || Shrirampur Corona Updates

Shrirampur 24Tass : श्रीरामपूर तालुक्यात 10 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. श्रीरामपुरातील कोव्हिड सेंटरमध्ये केलेल्या तपासणीत हे 10 जण करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 438 वर जाऊन पोहोचला आहे. Shrirampur Corona News

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या तपासणीत एकूण 49 जणांची तपासणी करण्यात आली होती, या मध्ये 10 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 39 जण हे निगेटिव्ह आढळून आले आहेत. काल निघालेल्या पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील वॉर्ड नं. एक मध्ये १, बेलापूर भागातील १, म्हाडा मधील २, निपाणी वडगाव भागातील २, संगमनेर रोड मधील २, गोंधवणी रोड १, बोरावकेनगर २ असे एकूण १० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. Shrirampur Corona News

श्रीरामपूर शहर व तालुक्यात आतापर्यंत २२७८ व्यक्तींचे स्त्राव घेण्यात आले असून त्यामध्ये ४५९  रुग्ण करोनाबाधित आढळले असून १०८७ रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत. श्रीरामपूर भागामध्ये करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ११ वर जावून पोहोचली आहे.Shrirampur Corona News

श्रीरामपूर नजीकच्या तालुक्यातील कोरोना स्थिती:  राहाता तालुक्यात दिवसभरात 30 जणांचे करोना अहवाल पॉठडटीव्ह आले असून सर्वाधिक 9 रूग्ण वाकडीत तर 8 जण पुणतांबा येथे सापडले. वाकडीतील 9 पैकी 8 जण एकाच कुटुंबातील आहेत. लोणी खुर्द येथे 7 तर लोणी बुद्रुक एकाला करोना संक्रमण झाले. संगमनेर तालुक्यात 39 करोनाबाधित आढळून आले. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या 1063 झाली आहे. तर 214 सक्रीय रूग्ण आहेत. कोपरगाव तालुक्यात 7 करोनाबाधित रुग्ण सापडले. तर मंगळवारी 28 जण करोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. राहुरी तालुक्यात मंगळवारी दहा जणांना करोनाची बाधा आढळून आली. तर अकोले तालुक्यात 8 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले. Shrirampur Corona News

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment