श्रीरामपूर नगर परिषदेत अभियंता कोरोना पॉझिटीव्ह .. Shrirampur Nagar Parishad Employee Corona Positive
श्रीरामपुर मध्ये काल 44 जणांची कोरोना रॅपीड टेस्ट करण्यात आली. त्यात शहरातील 14 जण करोना बाधित आढळून आले आहेत. यात श्रीरामपूर नगर परिषदेचा एक अभियंता करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या एकूण 473 पर्यंत जाऊन पोहोचली आहे तर काल फक्त 4 जण कोरोना आजारातून बरे होऊन घरी परतले आहेत.
श्रीरामपूर तालुक्यातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात करण्यात आलेल्या रॅपीड टेस्टमध्ये 44 जणांची तपासणी करण्यात आली. यात 14 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह तर 30 जण कोरोना निगेटिव्ह आले आहेत.
ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. वसंतराव जमधाडे प्रमुख असलेल्या संतलुक हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये 43 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 32 कोरून रुग्ण उपचार घेत आहेत.
काल पॉझिटीव्ह आलेल्या 14 जणांमध्ये श्रीरामपूर वॉर्ड नं. एकमध्ये 2, श्रीरामपूर वॉर्ड नं. दोनमध्ये 1, श्रीरामपूर वॉर्ड नं. तीनमध्ये 1, श्रीरामपूर वॉर्ड नं. सातमध्ये 3, नरसाळी मध्ये 1, गजानन वसाहत मध्ये 2, म्हाडा मध्ये 3, सुतगिरणी मध्ये 1 रुग्णांचा समावेश आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील आतापर्यंत 2303 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 453 जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 1117 जण कोरोना निगेटीव्ह आढळून आले आहेत. आजपर्यत 11 जणांचा करोना आजारामुळे मृत्यू झाला आहे.
श्रीरामपूर नगर परिषदेचा एक अभियंता करोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे श्रीरामपूर नगर परिषद चा अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारभार पाच दिवस बंद राहणार आहे.
आतापर्यंत जे मृत्यू झाले त्यांना कोरोना व्यतिरिक्त इतर कोणते आजार होते ते घोषित करा, कृपया.