श्री.साईबाबांच्या समाधी शताब्दी वर्षाचे निमित्ताने… आजचा साक्षीदार | SAKSHIDAR
दि.१ ऑक्टोबर २०१७ रोजी शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन भारताचे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविन्द यांचे शुभहस्ते झाले. त्यांच्याच हस्ते सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी “शिर्डी ते मुंबई” या पहिल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या घटनेला दि.१ ऑक्टोबर २०२१ रोजी दिवशी ४ वर्ष होत आहेत.

त्यानंतर ‘एलाइंस एयर कंपनीचे पहिले विमान ३ भारतीय व ३ मलेशियन असे ६ प्रवासी घेऊन मुंबईच्या दिशेने झेपावले. ‘शिर्डी-मुंबई’ या पहिल्या विमान प्रवासाचे साक्षीदार होण्याचा मान कोपरगावचे साईभक्त सुशांत घोडके, परेश उदावंत व संतोष गंगवाल तसेच मलेशियाचे विवेकानंदन बालकृष्णन, हनिता ऑनॉथिंडो, प्रेमनाथ विवेकानंदन यांना मिळाला. या प्रवाशांच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब होती.