mind4talk
गावातच करणार महिला एफटीकेकिटव्दारे पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी
पिण्याच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी आता प्रत्येक गावातील पाच महिला एफटीके किटद्वारे गावातच करणार आहेत. पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील महिलांना या करीता प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. 11 जानेवारी रोजी मोहाडी आणि तुमसर पंचायत समितीस्तरावर महिलांना एफटीके (Ftk kit) द्वारे पाणी तपासणी प्रात्यक्षिकाचे धडे देण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एम. कुर्तकोटी यांचे हस्ते एफटीके किटचे वितरण करण्यात आले.
पशुसंवर्धन विभागाच्या नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनेचे अर्ज स्वीकारण्यासाठी 14 जानेवारी पर्यंत मुदतवाढ
पशुसंवर्धन विभागाच्या सन 2022-23 या वित्तीय वर्षात नाविण्यपूर्ण व जिल्हास्तरीय योजनांचा लाभ घेण्यासाठी दि. 13 डिसेंबर, 2022 ते 11 जानेवारी, 2023 या कालावधीत https://ah.mahabms.com या संकेतस्थळावर व गुगल प्ले स्टोअरवरील मोबाईल ॲपवर अर्ज स्वीकारण्यात आले होते.
किटकनाशके उर्वरीत अंशमुक्त भाजीपाला प्रात्यक्षिकांचा शेतक-यांनी लाभ घ्यावा
जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत "लोकराजा राजर्षी शाहू महाराज सेंद्रीय शेती प्रोत्साहन योजना" राबविण्यात येत आहे. यामध्ये किटकनाशक उर्वरित अंशमुक्त भाजीपाला उत्पादन प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत. या योजनेस भाजीपाला उत्पादक शेतक-यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, इच्छुक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घेण्यासाठी तालुक्याच्या पंचायत समिती कृषि विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी भिमाशंकर पाटील यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक । कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी कालमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे – जिल्हाधिकारी
जिल्हास्तरीय बँकर्स समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व बँकांच्या विभागिय व्यवस्थापकांनी शिक्षण, घर, लघु उद्योग आणि शासनाच्या सर्व योजनांसाठी कर्ज लक्षांक वाढवावा. तसेच कर्ज प्रकरणे निकाली काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने घालुन दिलेली १५ ते ४५ दिवसाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्यात.
‘मधाचे गाव’ – ‘मधुमित्र’ उपक्रम संपुर्ण राज्यात राबविणार – महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे
देशातील पहिले मधाचे गाव- 'मांघर' या गावास महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गावात राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. याप्रसंगी बोलताना सभापती श्री. साठे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोदयोग मंडळाचा 'मधाचे गाव', 'मधुमित्र' हे अभिनव उपक्रम संपुर्ण देशात मार्गदर्शक ठरणारे उपक्रम असून राज्यातील प्रत्येक जिल्हयात हे उपक्रम राबविणार आहे.
समाज कल्याण विभागाची भारत सरकार शिष्यवृत्ती योजना । अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत महाविद्यालयांनी 20 जानेवारीपूर्वी कार्यवाही करावी
शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मधील प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती योजनाबाबत जिल्ह्यातील एकुण 15 महाविद्यालयांकडे सातत्याने पत्रव्यवहार, कॅम्प घेऊनही अर्ज मंजुरीबाबत कार्यवाही करण्यात येत नाही. तरी ज्या महाविद्यालयांकडे जास्तीत जास्त अर्ज प्रलंबित आहेत. अशा महाविद्यालयांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज मंजुरीबाबत शुक्रवार दि. 20 जानेवारी 2023 पुर्वीच कार्यवाही करावी, असे निर्देश समाज कल्याणचे सहायक आयुक्त अमित घवले यांनी दिले आहेत.
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासांठी क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी खेळाडूंनी १६ ते ३० जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा – मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील विविध ४० हजार पदांच्या भरतीची कार्यवाही करा - मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना – सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
जिल्ह्यात येथे मॉडेल करिअर सेंटरची स्थापना - सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता