mind4talk

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

प्राण्यांची वाहतुक व बाजारास अटींच्या अधीन राहून मान्यता

जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाची मोठया प्रमाणावर लागन झाल्याने राज्यात जनावरांचा बाजार भरविणे तसेच जिल्ह्यांतर्गत वाहतुक करणे यावर बंदी घालण्यात आली होती. काही अटी व शर्तीच्या अधीन राहून वाहतुक व बाजारास मान्यता देण्यात आली आहे. मात्र अटींचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा - डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावे ही प्रत्येक आईची इच्छा – डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख । गर्भसंस्कार-एक नवीन पाऊल’ उपक्रमाला भरघोस प्रतिसाद

आई ही आईच असते. ती श्रीमंत असो किंवा गरीब…आई ती आईच असते…आणि प्रत्येक आईला असेच वाटते की माझ्या पोटी सुदृढ मुल जन्माला यावं आणि माझा नऊ महिन्यांचा गरोदरपणा आनंददायी व्हावा. यासाठी प्रत्येक मातेने गरोदरपणात योगा आणि प्राणायाम करण्याचे आवाहन डॉ. चारुलता रोजेकर- देशमुख यांनी केले.

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी - श्री. शंभूराज देसाई

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाच्या 17 कोटी 29 लाखांच्या कामांना मंजूरी – श्री. शंभूराज देसाई

डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 17 कोटी 29 लाख रुपये निधी खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात डोंगरी विभाग विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न झाली.

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

सोमवारी महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन | राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023

राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 हे 11 ते 17 जानेवारी दरम्यान राबविण्याबाबत येत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी चालकांनी हेल्मेट परिधान करावे म्हणून महिला दुचाकी हेल्मेट रॅलीचे सोमवारी 16 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 9.30 वाजता आयोजन करण्यात आले आहे.

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्जासाठी 30 जानेवारीपर्यंत मुदतवाढ

इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य रेसिडेन्सियल पब्लीक सकुलमध्ये प्रवेशासाठी 26 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित परीक्षेकरीता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्हयातील सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळा, जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच सर्व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इ. 5 वी, 6 वी, 7 वी व 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जमातीचे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील.

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालयातर्फे चित्रकला व छायाचित्रण स्पर्धा

पर्यटन संचालनालय आणि भारतीय पर्यटन विकास सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जानेवारी २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यटन विषयक जागृती निर्माण करण्यासाठी चित्रकला स्पर्धा व खुल्या गटासाठी छायाचित्रण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे सुरु करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. यानुसार या प्रवर्गातील 100 मुले व 100 मुली या प्रमाणे एकूण दोन वसतिगृहे सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी सुरु करावयाची आहेत.

वसतिगृह सुरु करू इच्छिणाऱ्या संस्थांना संपर्क साधण्याचे सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग यांचे आवाहन