करिअर | नोकरी संधर्भ

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत चर्मकार बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तीचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खालील योजना राबविण्यात येणार आहेत.

राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजना : वरील विविध शासकीय योजनांचे र्भातिक व आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ कार्यालयामार्फत येणाऱ्या कार्यप्रणालीस गत वर्षाप्रमाणे याही वर्षी मान्यता मिळण्यासाठी अर्ज स्वीकृती खालील अटी व शर्तीनुसार महामंडळ कार्यालयात स्वीकारण्यात येणार आहेत.

विशेष घटक व बीज भांडवल योजनेंतर्गतचे यापूर्वीचे जुने कर्ज प्रस्ताव रद्द, बाद करण्यात येतील. कर्ज मागणी घटक व बीज स्वहस्ताक्षरात/टंकलिखित अथवा महामंडळाच्या विहित नमुन्यातील झेरॉक्स प्रतीत अर्ज स्वीकारण्यात येतील. महामंडळ राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. महामंडळ राबवित असलेल्या कुठल्याही शासकीय योजनेचा पती अथवा पत्नी यांनी लाभ घेतलेला असल्यास किंवा अर्जदार हा कुठलाही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार असल्यास कर्ज प्रस्ताव अपात्र/रद्द करण्यात येईल. अर्जदारांनी कर्ज प्रस्तावासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा), रेशन कार्ड झेरॉक्स/रहिवाशी दाखला, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, कोटेशन (जीएसटीसह), आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स/परवाना/बॅच बिल्ला, जागेचा पुरावा वीज देयक/टॅक्स पावती, व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र या कागदपत्रासह जिल्हा कार्यालयात व्यक्तीश: अर्ज दाखल करणे अनिवार्य असून कर्ज प्रस्ताव मध्यस्थामार्फत स्वीकारले जाणार नाहीत. अर्जदाराकडून सर्व परिपूर्ण कागदपत्र असलेलेच कर्ज प्रस्ताव स्वीकारले जातील. अर्जदाराने अर्जासोबत जोडलेल्या सर्व कागदपत्रांवर अर्जदाराची स्वाक्षरी आवश्यक असून अर्जदाराने दाखल केलेली कागदपत्रे खोटी आढळून आल्यास त्यास जबाबदार धरुन त्यांच्यावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. मध्यस्थ हे जर कामामध्ये हस्तक्षेप करीत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करुन शासकीय कामात अडथळा या सदराखाली संबंधित मध्यस्थावर गुन्हा दाखल करण्यात येईल. कर्ज प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी निवड समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन नंतरच कर्ज प्रस्ताव मंजुरीसाठी बँकेस/महामंडळाच्या प्रधान कार्यालयास पाठविण्यात येतील. प्राप्त कर्जप्रस्ताव बँकेस पाठवितांना एका उद्दिष्टास दोन पट या पध्दतीने कर्ज प्रस्ताव ज्येष्ठतेनुसार बँकेकडे शिफारस करण्यात येतील.

केंद्र शासनाची एनएसएफडीसी योजना : ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी एनएसएफडीसी कर्ज योजनेंतर्गत कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केलेले असून ज्याची लाभार्थी निवड समिती झालेली आहे. जे परिपूर्ण कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेत अशा लाभार्थ्यांची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावलेली असून संबंधित अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करुन खालीलप्रमाणे कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र, लाभार्थ्याचा विनंती अर्ज, कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू त्याचा जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्र , चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवाशी दाखला, दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईल असे कार्यालयाचे हमीपत्र, जर लाभार्थ्यांचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्यांची सेवा 5 ते 6 वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यक आहे. जिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळ पाहणी अहवाल व शिफारस, लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअर, अर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र, यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखला, रेशनकार्ड, रहिवाशी दाखला, निवडणूक आयोग ओळखपत्र. लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न बँक खाते क्रमांक, जीएसटी क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक, अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

चर्मकार समाजातील बांधवांनी आपली कागदपत्रे तात्काळ दाखल करुन जास्तीत जासत अर्जदारांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती योजनामार्फत साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचवावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, हिंगोली यांनी केले आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ | राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजना | केंद्र शासनाची एनएसएफडीसी योजना

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत चर्मकार बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तीचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खालील योजना राबविण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांचे आवाहन

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी लातूर येथे आज मुलाखतींचे आयोजन | ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे आयोजन | Jobs in Latur

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लातूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्रातर्फे प्रत्येक महिन्याला रोजगार मोहीम अर्थात ‘जागेवरच निवड संधी’चे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत 10 मे 2023 रोजी लातूर येथे मुलाखतींचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी कळविले आहे.

SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT (SIPM) | JOBS IN POULTRY | सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट | पोल्ट्री क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

SUGUNA INSTITUTE OF POULTRY MANAGEMENT (SIPM) | JOBS IN POULTRY | सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट | पोल्ट्री क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी…

सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही भारतातील तमिळनाडू, उधमलपेठ (Udumalpet) येथे स्थित पोल्ट्री प्रशिक्षण संस्था आहे. 2012 मध्ये सुगुणा ग्रुप या भारतातील आघाडीच्या पोल्ट्री कंपनीने त्याची स्थापना केली आहे. सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) ही संस्था कुक्कुटपालनाशी संबंधित विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देते, ज्यामध्ये कुक्कुट व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम, कुक्कुटपालनातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि ब्रॉयलर आणि लेयर फार्मिंगमधील अल्पकालीन अभ्यासक्रम यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना पोल्ट्री उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी सुगुणा इन्स्टिट्यूट ऑफ पोल्ट्री मॅनेजमेंट (SIPM) च्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात आलेली आहे.

RESUME BIODATA TIPS - HOW TO PREPARE RESUME & BIODATA IN ONE MINUTES । असा बनवा तुमचा रेझ्युमे / बायोडाटा एका मिनिटात

RESUME BIODATA TIPS – HOW TO PREPARE RESUME & BIODATA IN ONE MINUTES । असा बनवा तुमचा रेझ्युमे / बायोडाटा एका मिनिटात

रेझ्युमे / बायोडाटा (HOW TO PREPARE RESUME / BIO DATA) हा एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीचे शिक्षण, कामाचा अनुभव, कौशल्ये आणि कर्तृत्वाचा सारांश प्रदान करतो. नोकरीच्या मुलाखतीसाठी तुमच्या दारात पाऊल ठेवण्याची किल्ली उत्तम प्रकारे तयार केलेला रेझ्युमे / बायोडाटा (HOW TO PREPARE RESUME / BIO DATA) हा असू शकतो. तथापि, एक मजबूत आणि प्रभावी रेझ्युमे तयार करणे हे एक कठीण काम असू शकते, विशेषत: जर तुम्ही जॉब मार्केटमध्ये नवीन असाल किंवा काही वेळात तुमचा रेझ्युमे अपडेट केला नसेल. या लेखात, आम्ही यशस्वी रेझ्युमेच्या महत्त्वाच्या घटकांवर चर्चा करू आणि तुम्हाला वेगळे कसे बनवायचे याबद्दल टिपा देऊ.

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

नगर जिल्ह्याचा समृध्द वारसा | कृषी शिक्षणाची पंढरी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख उद्दिष्टे समोर ठेवून आज राहुरी कृषी विद्यापीठाचे कामकाज सुरू आहे. नगर, मनमाड या महामार्गावर अहमदनगरपासून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे विद्यापीठ आज महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले आहे.

अमृतवाहिनी प्रवरेकाठी वसलेल्या नेवासे (पूर्वीचे निधीनिवास) गावात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शके १२१२ मध्ये ज्ञानेश्वरी कथन केली. ज्ञानेश्वरी लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा नेवासे परिसरातलेच. करविरेश्वराच्या मंदिरात ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वर बसत असत, तो १.५ मीटर उंचीचा दगडी पैस खांबावर आज भाविकांचे श्रद्धास्थान बनला आहे.

विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार – पालकमंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देणार - पालकमंत्री दीपक केसरकर

हिंगोली, दि. 10 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियमानुसार महिला व बालविकास विभागांतर्गत 0 ते 18 वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रीत, बेघर, कैद्याची पाल्य, एकपालक, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची बालके अशा काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांना शासन निर्णयानुसार विहित करण्यात आलेल्या निकषानुसार बालकांना शैक्षणिक सहाय्यासाठी बाल संगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

प्रजासत्ताक दिनी विदयार्थ्याना तीन हजारावरून अधिक दाखल्याचे वाटप | शाळा / महाविदयालयातच विदयार्थ्यांना आजपासून मिळणार दाखले

इंद्रायणी थडी जत्रेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन | देशाच्या विकासासाठी महिलांना अर्थव्यवस्थेच्या प्रवाहात सहभागी करावे लागेल - उपमुख्यमंत्री

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

नागरी सेवा (UPSC)परीक्षेचे निःशुल्क प्रशिक्षण

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती सन 2022-23 चे प्रलंबित अर्ज महाविद्यालयांनी 30 जानेवारीपर्यंत पाठविण्याचे आवाहन

महाडीबीटी पोर्टलच्या महाविद्यलय, विद्यार्थी लॉगीनवरील शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन | MAHADBT