महाराष्ट्र शासन बातम्या

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार

नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे आवाहन

मुंबई,दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) व समिती सदस्य हे ११ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२३ याकालावधीत छत्रपती संभाजीनगर विभागाचा जिल्हानिहाय दौरा करणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून समितीच्या जिल्हानिहाय दौऱ्याचे वेळापत्रक कळविले आहे.

या दौऱ्या दरम्यान, समितीचे अध्यक्ष व सदस्य कामकाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर विभागातील (मराठवाडा) सर्व जिल्ह्यांमध्ये बैठक घेणार आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूली पुरावे, निजाम काळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इ. समितीस उपलब्ध करुन देण्यात यावीत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

समितीच्या बैठकीचे वेळापत्रक असे:

समितीची पहिली बैठक छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता बैठक घेण्यात येणार आहे. दि. १६ ऑक्टोबरला परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता समितीची बैठक होणार आहे. त्यानंतर हिंगोली येथे दि.१७ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे, नांदेड येथे दि. १८ ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता ही बैठक होणार आहे. दि.२१ ऑक्टोबरला लातूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११.०० वाजता, धाराशिव येथे दि.२२ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर बीड येथे दि. २३ ऑक्टोबरला सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समितीची बैठक होणार आहे.

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर अध्यक्षांसह समिती सदस्य जिल्हानिहाय बैठका घेणार नागरिकांनी त्यांच्याकडील दस्तावेज उपलब्ध करून देण्याचे ...

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा

दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा ठाणेकरांच्या वेगवान,सुलभ प्रवासासाठी रिंग मेट्रो प्रकल्प आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी घेतली केंद्रीय शहरे विकास मंत्री ...

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

नागरिकांनो पुढील दहा दिवस उष्णतेचे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन यवतमाळ : जिल्ह्यात मागील काही दिवसा पासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. पुढील ...

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजनांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर | जलशक्ती मंत्रालयाकडून भारतातील पहिली जलसंस्था जलगणना जाहीर

जलसंधारण योजना राबविण्यात महाराष्ट्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे. जलशक्ती मंत्रालयाने नुकताच भारतीय जलसंस्थांची पहिल्यांदाच गणना करुन एक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात जलसंधारण योजना सर्वाधिक प्रमाणात आणि यशस्वीरीत्या राबविण्यात यशस्वी ठरलेल्या राज्यांचा समावेश आहे. देशभरातील राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. यावर प्रकाश टाकणारा एक लेख....

महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण | दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतन

महाज्योतीचे मोफत सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण | दीड हजार विद्यार्थ्यांना लाभ ; प्रतीमाह 10 हजार विद्यावेतन

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) संस्था, इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने राज्यातील दीड हजार युवकांना मोफत मिलिटरी भरती परीक्षापूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी मंजूर विद्यार्थी संख्या 1500 ठेवण्यात आली आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत 75 टक्के उपस्थितीच्या अटीवर प्रशिक्षणार्थ्यास दरमहा 10 हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. आकस्मिक निधी एकवेळ 12 हजार रुपयाची तरतुद करण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षण पुणे येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत 28 मे ठेवण्यात आलेली आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तींचा त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी, त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळांचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचा बँक ऑफ इंडियाशी सामंजस्य करार

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याला चालना देण्यासाठी बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या दरम्यान 8 मे, 2023 रोजी पुणे येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील, बँक ऑफ इंडियाचे जनरल मॅनेजर राधाकांत, डेप्युटी जनरल मॅनेजर रविंद्र बोगा, डेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दास, चीफ मॅनेजर समीर देशपांडे हे उपस्थित होते.

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

शासकीय कार्यालयात तंबाखू सेवन करणाऱ्या 9 जणांवर कोटपा कायद्यांतर्गत कारवाई

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या निर्देशानुसार सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुसार लातूर शहरात जिल्हा तंबाखू नियंत्रण अंमलबजावणी पथकामार्फत बुधवारी (दि. 10) जिल्हा परीषद कार्यालय, माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय, सर्व शिक्षा अभियान कार्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. यावेळी नऊ व्यक्तींकडून एक हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत 2023-24 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

विशेष लेख | तंबाखूचे सेवन कर्करोगाला आमंत्रण !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन समाजात सर्रासपणे होत असल्याचे दिसते. तंबाखू खाल्ली की काम अधिक चांगल्याप्रकारे करता येते, तंबाखू खाल्याशिवाय कामात लक्ष लागत नाही, असे सांगून तंबाखूचे व्यसन करणारे लोक समर्थन करतात आणि तंबाखू व्यसनाला बळी पडतात. त्यातूनच कर्करोगासारख्या जीवघेण्या आजाराला आमंत्रण मिळते. व्यसन करताना आपल्या कुटुंबातील आई - वडील, बायको, मुलांचाही विचार केला जात नाही. परंतु कर्करोगासारखा गंभीर आजार झाल्यानंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही.