महाराष्ट्र शासन बातम्या

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

हिंगोली १४ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे, 2023 ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, हिंगोली येथे मुलाखतीस हजर रहावेत. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी फेसबूक पेज वर Department of Sainik Welfare, Pune (DSW) वर सर्च करुन त्यामधील एसएसबी-53 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

केंद्रामध्ये एसएसबी कोर्समध्ये प्रवेश मिळण्यासाठी खाली नमूद कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे व त्यासंबंधीचे पात्रता प्रमाणपत्र कोर्सला येताना सोबत घेऊन यावेत.

अ) कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस ॲकडमी एक्झामिनेशन (NDA_UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. ब) एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेडमध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. क) टेक्नीकल ग्रॅज्यूएट कोर्ससाठी एसएसबी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. ड) युनिर्व्हसिटी एन्ट्री स्कीम (University Entry Scheme) साठी एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबी साठी शिफारस केलेल्या यादीत नांव असावे.

अधिक महितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशक्षिण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई-मेल आयडी- peteoie@yahoo.in व दूरध्वनी क्र. 0253-2451032 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे, 2023 ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी निवासी आयुक्तांसोबत आढावा बैठक

केंद्रीय दिव्यांगजन व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या नुसार माहिती दळणवळण तंत्रज्ञान, कौशल्य विकास, व्यावसायिक प्रशिक्षण, ब्रेल भाषेचा प्रचार, सुगम्य वातावरणाची निर्मिती करण्यावर भर देण्याच्या महत्वपूर्ण सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी निवासी आयुक्तांसोबत झालेल्या आढावा बैठकीत केल्या.

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजनेत राहाता तालुक्यात २१ गावांची निवड | प्रशासन करतेयं शिवार फेऱ्यांद्वारे जनजागृती

जलयुक्त शिवार योजना २.० योजनेत राहाता तालुक्यातील २१ गावाची निवड करण्यात आलेली आहे. या गावांमध्ये ८ एप्रिल ते ११ मे २०२३ या कालावधीत शिवार फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या समन्वयाने ही योजना राबविण्यात येणार असून तालुका प्रशासन शिवार फेऱ्यांच्या माध्यमातून या योजनेची गावांमध्ये जनजागृती करत आहे.

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक - दोन कार्यालय सुरू

प्रत्येक शनिवार व रविवारी सह दुय्यम निबंधक क्रमांक – दोन कार्यालय सुरू

कार्यालयीन कामामुळे अनेक नागरिकांना सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करणे अवघड झाले होते. नागरिकांना सुटीच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालयाशी संबंधित कामे करता यावीत यादृष्टीने प्रत्येक शनिवार रविवार सह दुय्यम निबंधक क्रमांक दोन कार्यालय सुरू ठेवण्यात आले आहे. पक्षकारांना सुट्टी घेऊन किंवा आपले महत्त्वाचे काम सोडून दस्त नोंदणीच्या कामासाठी येण्याची आवश्यकता आता राहिली नाही. पक्षकार शनिवार रविवार दस्त नोंदणीचे कामकाज करून घेऊ शकतील.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत अशासकीय संस्थांनी आपला प्रस्ताव सादर करावा

महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य आहे. दरवर्षी साठवत असलेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. शासनामार्फत धरणामधील गाळ काढून शेतामध्ये वापरण्याकरिता गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार हि योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व धरणांमधील गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनःस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात वाढ देखील होईल. सर्व जलस्त्रोतात गाळ साठणे हि क्रिया कायमस्वरूपी असल्याने या योजना राज्यात तीन वर्षापर्यंत मर्यादित न राहता कायमस्वरुपी राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या "स्पार्क" कार्यक्रमाची सुरुवात

माविमच्या दिव्यांग जागृती व विकासाच्या “स्पार्क” कार्यक्रमाची सुरुवात

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना विशेष विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इंटरनँशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्या सहकार्याने स्पार्क हा पथदर्शी कार्यक्रम जिल्हात राबविण्यात येत आहे." स्पार्क " हा आंतरराष्ट्रीय कृषीविकास निधी (IFAD) चा एक महत्वकांक्षी प्रकल्प आहे.(लाईट फॉर दि वर्ल्ड), आंतरराष्ट्रीय कामगार संघटना व प्रोकासूट यांच्यासह एक संयुक्त पद्धतीने स्पार्क (SPARK) कार्यक्रम जगातील बुरकिना फासो,भारत, मोझांबिक आणि मालदिव या चार देशात राबविण्यात येत आहे. देशात २०११ च्या जनगणनेनुसार एकूण २ कोटी ६८ लक्ष व्यक्ती दिव्यांग आहेत,जे एकूण

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

सोयाबीनच्या उत्‍पादन वाढीसाठी अष्‍ठसुत्रीचा वापर करावा कृषी विभागाचे आवाहन

वाशिम जिल्‍हा हा सोयाबीनचे हब म्‍हणुन ओळखला जातो. एकुण खरीप लागवड क्षेत्रापैकी जवळपास ७५ टक्‍के क्षेत्रावर सोयाबीन पिक घेतल्‍या जाते. त्‍यामुळे जिल्‍हयाचे संपूर्ण अर्थकारण या सोयाबीन पिकावर अवलंबुन आहे. सध्‍याची सोयाबीन पिकाची उत्‍पादकता लक्षात घेता उत्‍पादकता वाढीसाठी फार मोठा वाव आहे. सन २०२२-२३ या वर्षातील जिल्‍हयाची सोयाबीनची सरासरी उत्‍पादकता १३८१ किलो प्रति हेक्‍टर आहे. ती सन २०२३-२४ या वर्षात वाढवुन १९३७ किलो करण्‍याचे उदिष्‍टे कृषि विभागाने निश्‍चीत केले आहे.