करिअर | नोकरी संधर्भ

पुणे,दि.७:- शिक्षकांनी स्वीकारलेले काम प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून सेवभावनेने करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

जिल्हा परिषदेमार्फत देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण प्रसंगी मंत्री ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुनंदा वाखारे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मंत्री श्री. पाटील म्हणाले,ब्रिटीशांची शिक्षणपद्धती त्यांच्या स्वार्थासाठी होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ‍शिक्षणाचा मूळ गाभा पुन्हा एकदा देशातल्या नागरिकांमध्ये बिंबविण्याचा प्रयत्न आहे. लहान वयात झालेले संस्कार घेऊनच मुले पुढे जात असतात. पूर्वी गुरुकुल मध्ये अनेक विषय मुलांना शिकवले जात आणि त्यात पारंगत होऊनच ते बाहेर पडत. सध्या विद्यार्थी एकाच विषयात पुढे असल्याचे दिसून येते.

नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षणातील टप्पे बदलण्यात येणार आहेत. शासन शिक्षणावर बराच खर्च करते. शिक्षकांनी मुलांवर संस्कार करण्यासाठी परिश्रम घ्यावेत.

वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी ठरावीक वेळेतच काम न करता व वेळेचा विचार न करता काम केले पाहिजे. शैक्षणिक विकासासाठी सामाजिक उत्तरदायित्वच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तो निधी शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह, क्रीडा विषयक सुविधा, ई-लर्निंग, शाळेसाठी कंपाऊंड बांधण्यासाठी वापरण्यात यावा, असे श्री.पाटील यांनी सांगितले.

यावेळी मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक, शिक्षक व केंद्रप्रमुख यांना मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षक उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट शिक्षक व अध्यक्ष चषक पुरस्काराचे वितरण • शिक्षकांनी प्रोफेशन म्हणून न करता मिशन म्हणून काम करावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

विद्यापीठ उपकेंद्राद्वारे कौशल्याधारीत व्यवसायाभिमूख शिक्षण देण्यात यावे - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील |•| उपकेंद्राचे भविष्यात पूर्ण विद्यापीठात रुपांतर व्हावे - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सेवायोजन कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू; विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; दि.8 सप्टेंबर रोजी:86 पदांच्या भरतीचे नियोजन

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

परदेश शिष्यवृत्तीकरिता सातारा जिल्ह्यामधुन विद्यार्थ्याची निवड

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत….

तासिका तत्वावरील शिल्पनिदेशक पदासाठी मुलाखत....

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

अग्निवीर निवड प्रक्रिया मानकापूर क्रीडा संकुलात पार पाडणार • नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी घेतला सैन्य अधिकाऱ्यांसोबत आढावा

31 डिसेंबर ते 2 जानेवारी विभागीय महसुल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा ...

जनकल्याणाच्या योजना – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

जनकल्याणाच्या योजना - राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कामे करावीत — जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून  कामे करावीत -- जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद • सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हयातील शिक्षकांशी संवाद
ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम – मुख्यमंत्री श्री. शिंदे

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हयातील शिक्षकांशी संवाद ज्ञानदानाची शिक्षकांची भूमिका आजही कायम                                                                      मुख्यमंत्री श्री. शिंदे