करिअर | नोकरी संधर्भ

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या

मराठी आणि ऊर्दू माध्यमाच्या पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training)  ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी देखील युट्यूब चॅनेल्स सुरू होणार आहेत.
अशा पद्धतीने मराठी, ऊर्दू,  हिंदी आणि इंग्रजी या चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरू करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. त्यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे कि, ‘इयत्ता पहिली ते दहावीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने चार युट्यूब चॅनेल सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. इयत्ता तिसरी ते बारावीसाठी आता जिओ टीव्हीवर एकूण १२ चॅनेल सुरु करण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य हे एकमेव असे राज्य आहे कि ज्याने चार माध्यमांमध्ये शैक्षणिक चॅनेल सुरु केले आहेत.’

पहिली ते दहावीच्या अभ्यासाकरिता SCERT चे चार YouTube चॅनेल || महाराष्ट्र हे पहिले राज्य

इ.१ ली ते इ.१० वीच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ४ YouTube Channel सुरु केले आहेत. लवकरच हिंदी आणि इंग्रजी माध्यमांसाठी सुद्धा सुरु होणार आहेत. @scertmaha

— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 24, 2020


Credit : Varsha Gaikwad Twitter Account
करोना या महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने १५ जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे मात्र, प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्याने राज्य सरकारने ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला. दरम्यान, जिओ टीव्हीवर देखील राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत इयत्ता तिसरी ते बारावीसाठी एकूण १२ वाहिन्या सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भातही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट केले होते.
राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. पूर्व प्राथमिक वर्गांसाठीही ऑनलाइन वर्ग सुरू करण्याचे आदेश जारी झाले आहेत. तसेच या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्गाची वेळेची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.

पहिली ते दहावीच्या अभ्यासाकरिता SCERT चे चार YouTube चॅनेल || महाराष्ट्र हे पहिले राज्य

राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच SCERT (State Council of Educational Reserch & Training) ने चार युट्यूब वाहिन्या सुरू केल्या मराठी आणि ऊर्दू ...

VIDEO : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ – 2020|| Annasaheb Patil Loan Scheme Information- 2020

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ – 2020|| Annasaheb Patil Loan Scheme Information- 2020

तयारी स्पर्धा परीक्षांची || इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये || History Famous Slogans

तयारी स्पर्धा परीक्षांची || सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज – इतिहासातील काही प्रसिद्ध वक्तव्ये  || History Famous Slogans सर्व  स्पर्धा परीक्षांचे (Preparation of Competitive Exam ...

तयारी स्पर्धा परीक्षांची : सर्व विषयांवरील सामान्य ज्ञान प्रश्नसंच (GK Questions in Marathi)

  तयारी स्पर्धा परीक्षांची :  सर्व विषयांवरील सामान्य ज्ञान प्रश्नसंच (GK Questions in Marathi)  सामान्य ज्ञान जनरल नॉलेज (General Knowledge in Marathi) आणि चालू घडामोडी (Current Affairs in Marathi) हा घटक स्पर्धा परीक्षा ...

तयारी स्पर्धा परीक्षांची || सामान्य ज्ञान, जनरल नॉलेज – संपूर्ण वर्षाचे दिनविशेष ( महत्वाचे दिन )

स्पर्धा परीक्षा  – एक करियर ::  तयारी स्पर्धा परीक्षांची सध्या मराठी पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये करिअरचा एक पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षांना (Preparation of Competitive Exam ...

नागरी सेवा परीक्षांच्या (UPSC) मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना विमानभाडे || Air flight for Candidates for Interviews

नागरी सेवा परीक्षांच्या (UPSC) मुलाखतीसाठी जाणाऱ्या उमेदवारांना विमानभाडे  कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे सुरू नसल्याने त्यामुळे नागरी सेवा परीक्षांच्या मुलाखतीसाठी दिल्लीला जाणाऱ्या उमेदवारांना ...

स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान : काळाराम मंदिर सत्याग्रह एक क्रांतिकारक घटना || Competitive Exam General Knowledge – Kalaram Madir Satyagrah

काळाराम मंदिर सत्याग्रह आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाशिक मधील पंचवटीतील काळाराम मंदिर प्रवेशासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे.काळा राम ...

2020 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची (List of 20 Richest people in the world 2020 in Marathi) यादी

2020 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (2020 Richest people in the world फोर्ब्सच्या अंदाजानुसार 18 मार्च 2020 पर्यंत जगभरात 2,095 अब्जधीश होते. जगातील सर्व अब्जाधीशांची ...