करिअर | नोकरी संधर्भ

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

वर्धा, १४ मे २०२३ (आजचा साक्षीदार) – मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत 2023-24 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारा सर्वसमावेश मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला जिल्ह्यात गेल्या दोन वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असून मागील वर्षी 255 कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आली आहे.

मोठ्या प्रमाणावर कर्ज प्रकरणे पोर्टलवर दाखल होत असून विविध बँक शाखांच्या माध्यमातून कर्जप्रकरणांना मंजूरी मिळत आहे. सन 2023-24 साठी जिल्ह्याला 630 युवक युवतींना वित्तीय संस्थेच्या माध्यमातुन लाभ देण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले स्थानिक रहिवासी ज्यांचे वय 18 ते 45 वर्ष आहे, असे लाभार्थी पात्र आहेत. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यांना पाच वर्ष शिथिल आहे. रुपये 10 लाखांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 7 वी पास तसेच 25 लाख रुपयांच्या प्रकल्पासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी पास असावी. या योजनेत सेवा उद्योग तसेच कृषिपुरक उद्योग, व्यवसायासाठी 20 लाख रुपये तसेच उत्पादन प्रकल्पाच्या प्रवर्गासाठी 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज सुविधा उपलब्ध असुन एकुण प्रकल्प किंमतीच्या शहरी भागासाठी 25 टक्के व ग्रामीण भागासाठी 35 टक्के पर्यंत अनुदान उपलब्ध होणार आहे.

सदर योजना ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येत आहे. आपला उद्योग व्यवसाय उभारणीसाठी शासनाच्या https://maha-cmegp.gov.in या संकेतस्थावर भेट देऊन आपले गाव ज्या बँक शाखेत येते त्या बँकेची निवड करुन अर्ज जवळच्या सेतु सुविधा केंद्रात, मोबाईलवरुन अथवा जिल्हा उद्योग केंद्रात दाखल करावा, असे जिल्हा उद्योग केंद्राच्यावतीने कळविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी प्रस्ताव आमंत्रित | उद्योगासाठी मिळणार 50 लाखापर्यंत कर्ज | 630 युवक युवतींना योजनेचा लाभ देणार

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गंत 2023-24 वर्षासाठी उद्योग व सेवा उद्योग उपक्रमांसाठी सुशिक्षित बेरोजगारांना 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची सुवर्ण संधी

भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 29 मे, 2023 ते 7 जून, 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 53 आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

धनगर समाजातील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी निवासी शाळांसाठी 19 मे पर्यंत प्रस्ताव सादर करावेत

विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या शासन निर्णयान्वये धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्यास मान्यता देण्यात आली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तींची पूर्तता करुन या योजनेअंतर्गत काम करणा-या शाळांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. हे प्रस्ताव दिनांक 19 मे 2023 पर्यंत समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

मराठा उद्योजक घडविण्यासाठी शासनाचा सामंजस्य करार

शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या अंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त मराठा उद्योजक घडविण्याकरिता बँक ऑफ इंडिया व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामध्ये सामंज्यस करार करण्यात आला.

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

उद्योजकता विकास केंद्राचा बंजारा ड्रेस मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम 20 मेपर्यंत प्रशिक्षण इच्छूकांनी संपर्क साधावा

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन 2023-24 अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या बंजारा ड्रेस मेकिंगवर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

उद्योजकता विकास केंद्राचे ब्युटी पार्लर प्रशिक्षण

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने सुशिक्षित बेरोजगार युवती व महिलांसाठी सर्वसाधारण योजना सन २०२३-२४ अंतर्गत सहशुल्क स्वरूपाच्या ब्युटीपार्लर (ब्युटी अँड वेलनेस)" वर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डीबीटी पोर्टल | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग | मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या विविध शिष्यवृत्तीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रीयेस ३० मे पर्यंत मुदतवाढ | डीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरण्याचे समाज कल्याण आयुक्तांचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनांकरीता सन २०२२-२३ मध्ये नवीन व नुतनीकरण अर्ज करण्यासाठी प्रक्रियेस ३० मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करून अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Hostel Admission Starts

फलटण येथील शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु | Phaltan Government Hostel Admission Starts

फलटण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. इ. 8 वी ते 10 वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जातो. मोफत भोजन, निवास, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बेडिंग साहित्य तसेच शैक्षणिक साहित्य पुरविली जातात. तसेच प्रवेशितांना दरमहा रु. 500/- निर्वाहभत्ता दिला जातो.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ | उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्जाचे अर्ज स्वीकृती

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे आवाहन | उद्योग/व्यवसाय करण्यासाठी कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळा मार्फत यापुर्वी कोणत्याही प्रकारचा लाभ न घेतलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील वैयक्तीक अर्जदारांना उद्योग/व्यवसाय करण्यासाठी प्राप्त उद्दीष्टानुसार विविध बँकांमार्फत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याकरीता कर्जाचे अर्ज स्वीकृतीचा कार्यक्रम दि. 11 मे 2023 ते दि. 9 जुन 2023 दरम्यान (सुट्टीचे दिवस वगळुन) वेळ सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.00 वाजता संबंधित महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, जिल्हाधिकारी कार्यालय समोर जालना येथे घेण्यात येणार आहे.

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ | राज्य शासनाच्या अनुदान योजना व बीज भांडवल योजना | केंद्र शासनाची एनएसएफडीसी योजना

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातंर्गत चर्मकार बांधवांनी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभार, मोची, ढोर व होलार) व्यक्तीचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात मानाचे स्थान मिळविण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये खालील योजना राबविण्यात येणार आहेत.