महाराष्ट्र बातम्या

जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब – जिल्हाधिकारी गोविंद बोडके

राज्यस्तरीय हँडबॉल व बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचा उदघाटन सोहळा दिमाखात

पालघर दि. २३ जानेवारी २०२३ (आजचा साक्षीदार) : जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले प्रथमतःच पालघरला राज्यस्तरीय हँडबॉल व बॉक्सिंग स्पर्धांचे यजमानपद प्राप्त झाले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. पालघर जिल्ह्याला प्रथमतः या स्पर्धांचा मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी आवर्जून सांगितले. जिल्हा क्रीडा संकुल विकासासाठी आवश्यक ते प्रयत्न करून हे क्रीडा संकुल सुसज्ज करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. येत्या काळात हे क्रीडा संकुल क्रीडा विश्वात मॉडेल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केला.

दोन दिवसीय राज्यस्तरीय हँडबॉल व बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन पालघरच्या जिल्हा क्रीडा संकुलावर शनिवारपासून सुरू झाल्या. राज्यभरातील आठ विभागासह क्रीडा प्रबोधिनी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकारी गोविंद बोडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किरण सावे पांचाळ समाज मध्यवर्ती मंडळाचे सचिव रवींद्र चाफेकर स्पर्धेचे टेक्निकल डायरेक्टर कोहली आदींच्या प्रमुख उपस्थितीत क्रीडा संचालनालयाच्या ध्वजाचे आरोहण करून स्पर्धांना सुरुवात केली गेली.

खेळाडू मधील गुणवत्ता ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले खेळाला चांगला वाव असून जास्तीत जास्त खेळाडू पालघर जिल्ह्याच्या मातीतून व जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून तयार होऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव या खेळाडूंनी झळकवावे अशी अपेक्षा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हा क्रीडा संकुलासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह शासनाने अनेक प्रयत्न केले असून खेळांना ते विशेष महत्त्व देत असल्यामुळे पालघरला राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचे यजमानपद मिळाले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास वनमाने यांनी सांगितले. तसेच क्रीडा स्पर्धेला उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंचे त्यांनी आपल्या प्रास्ताविकांमधून अभिनंदन केले. दोनवेळा शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त जिम्नॅस्टिक क्रीडा मार्गदर्शक व खेळाडू वर्षा उपाध्याय यांचा विशेष सत्कार जिल्ह्याच्या वतीने करन्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या हस्ते हँडबॉल मैदानाचे पूजन करून नागपूर विरुद्ध पुणे व अमरावती विरुद्ध नाशिक या हँडबॉल स्पर्धांचे सुरुवात करण्यात आले. याच बरोबरीने जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी खेलो इंडियाच्या बॉक्सिंग रिंग मध्ये देवांग महागावकर विरुद्ध तेजस गोडसे या बॉक्सिंग खेळाडूंच्या सामन्याची सुरुवात करून दिली.

उद्घाटन सोहळ्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रीमियर रीदमिक जिम्नॅस्टिक अकॅडमी मार्फत रोमहर्षक व थरारक रिदमिक जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकाराचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवर व खेळाडू समोर सादर केले गेले. या प्रत्यक्षिकाने उपस्थितांची मने जिंकून चांगलीच दाद मिळवली. तसेच चाफेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत लेझीम, स्वागतगीत, गणेशवंदना सादरीकरण केले.१४ ते १९ वयोगटातील मुला-मुलींच्या या स्पर्धा रविवारीही सुरू राहणार असून रविवारी या स्पर्धांची सांगता होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण थोरात यांनी केले तर आभार क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ यांनी मानले.

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

जिल्ह्याला राज्यस्तरीय स्पर्धांचे यजमानपद मिळणे ही अभिमानाची बाब – जिल्हाधिकारी

जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी शासन प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले प्रथमतःच पालघरला राज्यस्तरीय हँडबॉल व बॉक्सिंग स्पर्धांचे यजमानपद प्राप्त झाले आहे. या स्पर्धांच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी बोडके बोलत होते. पालघर जिल्ह्याला प्रथमतः या स्पर्धांचा मान मिळाल्याचा अभिमान असल्याचे जिल्हाधिकारी बोडके यांनी आवर्जून सांगितले.

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 22 जानेवारी 2023

आजचा साक्षीदार | दिवसभरातील महत्वाच्या टॉप बातम्या : 22 जानेवारी 2023

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली

म्हाडाच्या ऑनलाईन जाहिरीतीसाठी अद्ययावत एकात्मिक लॉटरी प्रणाली

शिर्डी शहराचा कायापालट करणारा सौंदर्यकरणाचा पहिल्या टप्प्यातील ५२ कोटींच्या कामांचा प्रस्तावित विकास आराखडा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री.साईबाबा चरणी अर्पण केला. शिर्डी शहर व परिसराबद्दल देशभरातील भाविकांमध्ये आत्मीयता वृध्दींगत व्हावी, यासाठी शिर्डीचा येत्या काळात अंर्तबाह्य कायापालट करण्यात येणार आहे. ‘विकासशील शिर्डी, सुंदर शिर्डी, आनंददायी शिर्डी’ अशी प्रतिमा शिर्डीची होईल, यावर भर राहणार असल्याचा विश्वास पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

अटल भूजल योजना । ‘चला जाणूया नदीला’ अभियानात अटल भूजल योजनेविषयी जनजागृती

अटल भूजल योजना । ‘चला जाणूया नदीला’ अभियानात अटल भूजल योजनेविषयी जनजागृती

महाराष्ट्रातील सागर परिक्रमेसाठी संपूर्ण सहकार्य मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थित आढावा बैठक

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मत्स्यपालन प्रादेशिक संशोधन केंद्र चंद्रपूरात उभारावे : मत्स्यपालन मंत्री सुधीर मुनगंटीवार

सकस आहार तिरंगा थाळी स्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण । राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी - मुख्यमंत्री

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

जिल्ह्यात केंद्रीय योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

गटई कामगारांना अस्मानी संकटापासून संरक्षण मिळावे तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी शंभर टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॅाल देण्याची योजना राबविण्यात येते. गटई कामगार योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.